पीक कर्ज वाटपाची अंतिम मुदत ३१ मे!

By admin | Published: May 3, 2017 01:51 AM2017-05-03T01:51:53+5:302017-05-03T01:51:53+5:30

वाशिम- प्रशासनामार्फत पीक कर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. ३१ मे पर्यंत पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

31 deadline for crop loan allotment! | पीक कर्ज वाटपाची अंतिम मुदत ३१ मे!

पीक कर्ज वाटपाची अंतिम मुदत ३१ मे!

Next

वाशिम : खरीप हंगामाकरिता सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना ११५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी ३१ मे ही अंतिम मुदत असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधून पीक कर्जाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने मंगळवारी करण्यात आले.
१ एप्रिल २०१७ पासून जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली. यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वीच मशागतीसाठी पैसे उपलब्ध होण्यासाठी प्रशासनामार्फत पीक कर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. ३१ मे पर्यंत पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आली.

Web Title: 31 deadline for crop loan allotment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.