चौथ्या दिवशी ३१ अर्ज दाखल!
By admin | Published: October 28, 2016 02:23 AM2016-10-28T02:23:58+5:302016-10-28T02:23:58+5:30
वाशिम न. प. निवडणूक; अध्यक्षपदासाठी सहा अर्ज.
वाशिम, दि. २७- जिल्हय़ातील तीन नगर परिषद निवडणुकीत चौथ्या दिवशी एकूण ३१ अर्ज दाखल झाले. यामध्ये वाशिम येथे आठ, मंगरुळपीर येथे १२ आणि कारंजा येथील ११ अर्जांंचा समावेश आहे.
कारंजा, वाशिम, मंगरुळपीर नगर परिषद निवडणुकीसाठी २४ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली. तिसर्या दिवसापर्यंंत वाशिम येथे दोन, कारंजा दोन तर मंगरुळपीर येथे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. येत्या २७ नोव्हेंबर रोजी वाशिम, कारंजा व मंगरुळपीर नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. वाशिम येथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अशोक हेडा यांनी गुरुवारी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. उर्वरित पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला नाही.
वाशिम, कारंजा व मंगरुळपीर या तीनही नगर परिषदेतील सत्ता ताब्यात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ या प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याला केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.
वाशिम नगर परिषदेसाठी चवथ्या दिवशी सदस्य पदासाठी सात तर अध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल झाला. मंगरुळपीर येथे सदस्य पदासाठी नऊ आणि अध्यक्ष पदासाठी तीन अर्ज दाखल झाले. अध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे बानो रहीम चौधरी व कमीज आसिया मिर्झा उबेद बेग, राष्ट्रवादीतर्फे खा मयजबीन सईन खा यांनी अर्ज दाखल केले.
कारंजा नगर परिषदेत सदस्य पदासाठी नऊ आणि अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आले. यामध्ये अध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे दिलीप भोजराज तर अपक्ष म्हणून किशोर देवळे यांनी अर्ज भरला.