पीक विम्यासाठी ३१ जुलैपूर्वीचे पीक पेरणी प्रमाणपत्र बंधनकारक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 07:59 PM2017-08-03T19:59:08+5:302017-08-03T20:01:45+5:30

वाशिम : राज्यात खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून या योजनेत सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ४ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, पीक विम्याच्या प्रस्तावासोबत ३१ जुलै २०१७ अथवा त्यापूर्वीचे पीक पेरणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी दिली.

31 July pre-crop certification binding for crop insurance! | पीक विम्यासाठी ३१ जुलैपूर्वीचे पीक पेरणी प्रमाणपत्र बंधनकारक !

पीक विम्यासाठी ३१ जुलैपूर्वीचे पीक पेरणी प्रमाणपत्र बंधनकारक !

googlenewsNext
ठळक मुद्देखरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना  योजनेत सहभागी होण्यासाठी ४ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ ३१ जुलै २०१७ अथवा त्यापूर्वीचे पीक पेरणी प्रमाणपत्र असणे आवश्यक 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यात खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून या योजनेत सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ४ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, पीक विम्याच्या प्रस्तावासोबत ३१ जुलै २०१७ अथवा त्यापूर्वीचे पीक पेरणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी दिली.
पीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी झाल्याने, राज्यात ४ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ फक्त बिगर कर्जदार शेतकºयांसाठी लागू असल्याचेही गावसाने यांनी स्पष्ट केले. वाढीव कालावधीत आॅनलाईन पध्दतीने जनसुविधा केंद्रांमधून अथवा स्वत: शेतकºयांनी थेट भरलेले अर्जच मान्य करण्यात येतील. या प्रस्तावासोबत ३१ जुलै २०१७ पूर्वीचे पीक पेरणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

Web Title: 31 July pre-crop certification binding for crop insurance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.