वाशिम जिल्ह्यात आणखी ३१ पॉझिटिव्ह; ३१ कोरोनामुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:50 PM2020-10-11T12:50:04+5:302020-10-11T12:50:19+5:30
CoronaVirus in Washim शनिवारी ३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात सप्टेंबरच्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट येत आहे. शनिवारी जिल्ह्यात आणखी ३१ जणांना कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आता एकूण रुग्णसंख्या ४९२७ वर पोहचली. दरम्यान, शनिवारी ३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. त्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात कमी रुग्ण आढळून येत असल्याचे दिसून येते. शनिवारी ३१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील जैन कॉलनी येथील १, समर्थ नगर येथील ४, टिळक चौक येथील १, मोठा गवळीपुरा येथील १, राजनी चौक येथील १, सुभाष चौक येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, सावरगाव बर्डे येथील २, सुपखेला येथील १, बिटोडा तेली येथील १, रिसोड शहरातील १, क्षीरसागर मळा येथील १, लोणी फाटा येथील २, वाकद येथील १, हिवरा पेन येथील १, चिचांबाभर येथील १, मंगरूळपीर शहरातील ३, बेलखेड येथील १, मोहरी येथील १, नागी येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. दोनयेथील १ व इतर ठिकाणचे २, मानोरा तालुक्यातील चिखली येथील १ अशा ३१ जणांचा समावेश आहे.
आता एकूण कोरोनाबाधित रुग्ण ४९२७ झाले असून, यापैकी ४१६४ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, शनिवारी ३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नव्याने आढळून आलेल्या ३१ कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.
(प्रतिनिधी)