‘नो-मास्क’ प्रकरणी दीड वर्षात ३.१९ कोटींची दंड वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:17+5:302021-08-12T04:46:17+5:30
वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला. तत्पूर्वीपासूनच कोरोना संसर्गासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. ...
वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला. तत्पूर्वीपासूनच कोरोना संसर्गासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. त्यात दुचाकी, चारचाकी वाहनधारकांसाठी काही कठोर नियमांची तरतूदही केली होती. प्रामुख्याने आसन मर्यादा आणि मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. याअंतर्गत पोलिसांनी जिल्हाभरात मिळून ६५,८९० लोकांवर कारवाई करत ३ कोटी १९ लाख ५० हजार रुपयांची दंड वसुली केली. त्यात १५ फेब्रुवारी ते ६ ऑगस्ट या जवळपास साडेपाच महिन्यांच्या काळातच ३५ हजार ५२० वाहनचालकांकडून १ कोटी ७७ लाख ६० हजार रुपयांच्या दंडाची कारवाई पोलिसांनी केली आहे.
--------------------
ट्रिपल सीटप्रकरणी ५५ लाखांवर दंड वसुली
कोरोना संसर्गाच्या काळात घालून दिलेल्या नियमांच्या उल्लंघनप्रकरणी पोलिसांनी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यात दुचाकीवर ट्रिपल सीटप्रकरणी २७ हजार ८०६ वाहनधारकांना ५५ लाख ६१ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी १३ लाख ३१ हजार ८०० रुपये रोख वसुली झाली, तर ई-चालान दंडाचे प्रमाण ४२ लाख २९ हजार ४०० रुपये आहे.
----------------
ई-चालान दंडाचे प्रमाण अधिक
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात वाशिम पोलिसांनी दीड वर्षाच्या काळात ६५,८९० लोकांवर दंडात्मक कारवाई केली असली तरी त्यापैकी केवळ ८३ लाख ७५ हजार ४०० रुपयांच्या दंडाचीच रोख वसुली झाली, तर २ कोटी ३५ लाख ७४ हजार ५०० रुपये ई-चालान स्वरूपात दंडवसुली करण्यात आली. ई-चालानमधील मोठ्या प्रमाणात दंड वाहनमालकांनी भरला आहे.
--------------------
एकूण केसेस- ६५,८९०
एकूण दंड- ३,१९,४९,९००
रोख दंड- ८३,७४,४००
ई-चालान दंड- २,३५,४,४००
--------------------