३२ ‘लोटा’बहाद्दरांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:22 AM2017-08-14T02:22:31+5:302017-08-14T02:22:48+5:30

वाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत (ग्रामीण) जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने रविवारी मंगरूळपीर तालुक्यातील पाच गावांना भेटी देऊन ३२ ‘लोटा’बहाद्दरांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.

32 Action against the 'Lotus' violations | ३२ ‘लोटा’बहाद्दरांविरुद्ध कारवाई

३२ ‘लोटा’बहाद्दरांविरुद्ध कारवाई

Next
ठळक मुद्देगुड मॉर्निंग पथक : पाच गावांना दिल्या भेटी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत (ग्रामीण) जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने रविवारी मंगरूळपीर तालुक्यातील पाच गावांना भेटी देऊन ३२ ‘लोटा’बहाद्दरांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.
रविवारचा दिवस असतानाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या निदेर्शानुसार, वाशिम जि.प.च्या स्वच्छ भारत मिशन विभागाने सकाळी ५ वाजता मंगरूळपीर तालुक्यातील हगणदरीचे प्रमाण जास्त असलेल्या गावांना लक्ष्य केले. तर्‍हाळा, पुंजाजी नगर, ईचा, शेलूबाजार व वनोजा येथे भेटी दिल्या असता एकूण ३२ जण उघड्यावर जाताना आढळून आले. या ३२ जणांकडून प्रत्येकी १२00 रुपये दंड वसूल करण्याच्या सूचना संबंधित ग्रामसचिवांना देण्यात आल्या. रविवारी १९५0 रुपये दंड वसूल करण्यात आला. काही लोकांचा पाठलाग करून या पथकाने दंड वसूल केला. या पथकामध्ये स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा सल्लागार राम शंृगारे, अमित घुले, रविचंद्र पडघान, तालुका समन्वयक अभय तायडे, ज्ञानेश्‍वर महल्ले, रवी राठोड यांच्यासह धडक कृती दल प्रमुख अनिता सहस्रबुद्धे, नरेंद्र बगळे, जनार्दन तिखे यांचा समावेश होता. गुड मॉर्निंग पथकाने तर्‍हाळा येथील चार जणांना शेलूबाजार पोलीस चौकीत आणले. येथे  या चार जणांकडून १२00 रुपयांचा दंड भरण्याचा लेखी कबुली जबाब घेतल्यानंतर  सोडून देण्यात आले. गुड मॉर्निंग पथकाने ‘लोटा’बहाद्दरांना शासकीय वाहनात बसवून शेलूबाजार पोलीस चौकी येथे दंडात्मक कारवाईसाठी आणले होते. यावेळी गावकर्‍यांनी या शासकीय वाहनाभोवती एकच गर्दी केली होती. वनोजा येथील नवरा-बायकोला सोबत उघड्यावर जाताना गुड मॉर्निंग पथकाने पकडले, तेव्हा गावात चांगलीच चर्चा रंगली होती. काही लोकांना पकडून शासकीय वाहनात कोंबले, तेव्हा गावातील नागरिकांनी गाडीजवळ मोठी गर्दी केली होती.
उघड्यावर जाणार्‍यांविरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने आता गुड मॉर्निंग पथकासोबत धडक कृती दल सक्रिय केले आहे. यापूर्वी जि.प.च्यावतीने लोटा जप्ती, उठाबशा काढून अथवा समज देऊन सोडण्यात येत होते. पुढील दोन महिने संकल्प स्वच्छतेचा- स्वच्छ महाराष्ट्राचा, हे विशेष अभियान राबविले जात आहे. प्रत्येक तालुक्यात दररोज गुड मॉर्निंग मोहीम राबविण्यात येणार आहे. उघड्यावर शौचास जाणार्‍यांविरुद्ध १२00 रुपये दंड व दंड न भरल्यास दुसर्‍या दिवशी पोलीस कारवाई करण्याचे निर्देश सीईओ गणेश पाटील यांनी दिले.

Web Title: 32 Action against the 'Lotus' violations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.