३२ पॉझिटिव्ह; ३३ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:32+5:302021-06-22T04:27:32+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अत्यल्प झाले ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अत्यल्प झाले तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. सोमवारी नव्याने ३२ रुग्ण आढळून आले तर ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आणखी एका मृत्यूची नोंद सोमवारी घेण्यात आली. मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यात चार, रिसोड तालुक्यात सात, मालेगाव तालुक्यात एक, मंगरूळपीर तालुक्यात १५, कारंजा लाड तालुक्यात दोन रुग्ण आढळून आला. आतापर्यंत ४१,२६२ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०३१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६१७ जणांचे मृत्यू झाले. जिल्ह्याबाहेरील ३ बाधितांची नोंद झाली. नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
००००
३२९ सक्रिय रुग्ण
सोमवारच्या अहवालानुसार नव्याने ३२ रुग्ण आढळून आले तर ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ३२९ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
मानोरा तालुका निरंक
सोमवारच्या अहवालानुसार मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम शहरात दोन तर ग्रामीण भागात दोन, रिसोड शहरात एक तर ग्रामीण भागात सहा, मंगरूळपीर शहरात सहा तर ग्रामीण भागात ९ आणि कारंजा शहर व ग्रामीण भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.
0000000000000000