अधिमुल्य रक्कम थकविली; ३२ गाळ्यांना ठोकले सील; वाशिम नगर परिषदची कार्यवाही

By दिनेश पठाडे | Published: February 2, 2024 02:04 PM2024-02-02T14:04:37+5:302024-02-02T14:05:17+5:30

व्यापारी संकुलातील अनेक व्यापाऱ्यांनी केवळ अनामत रक्कम भरून गाळ्यांवर ताबा मिळवला होता.

32 seals struck; Proceedings of Washim Nagar Parishad | अधिमुल्य रक्कम थकविली; ३२ गाळ्यांना ठोकले सील; वाशिम नगर परिषदची कार्यवाही

अधिमुल्य रक्कम थकविली; ३२ गाळ्यांना ठोकले सील; वाशिम नगर परिषदची कार्यवाही

वाशिम : नगर परिषद वाशिम मालकीच्या अकोला नाका स्थित व्यापारी संकुलातील अधिमुल्य रक्कम थकीत असलेल्या ३२ गाळ्यांवर कारवाई करुन या दुकानांना सील ठोकण्यात आले आहे. नगर परिषदने १ आणि २ फेब्रुवारीला ही कारवाई केली.

व्यापारी संकुलातील अनेक व्यापाऱ्यांनी केवळ अनामत रक्कम भरून गाळ्यांवर ताबा मिळवला होता. व्यापाऱ्यांकडून अधिमुल्य रक्कम भरण्यास अनेकजण टाळाटाळ करीत होते. अशांवर वारंवार नोटीस देऊन ही रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नगर परिषच्या वतीने व्यापारी संकुलातील ३२ दुकानांना सील ठोकण्यात आले. ७ फेब्रवारीपर्यंत थकीत अधिमुल्य रक्कम भरण्याच्या सूचना नगर परिषदच्या पथकाने दिल्या आहेत. ही कार्यवाही मुख्याधिकारी तथा प्रशासक निलेश गायकवाड, नगर अभियंता अशोक अग्रवाल, मिळकत व्यवस्थापक वैभव पांडे, कार्यालय अधीक्षक राहुल मारकड, पाणीपुरवठा अभियंता गजानन हिरेमठ, कर निरीक्षक प्रकाश दाभाडे, स्थापत्य अभियंता अमित घुले, गणेश पुरे, अमोल कुमावत, गजानन उलेमाले, सुरेश बैरवार, नरेंद्र साखरकर, संतोष किरळकर, राजू यादव, महेंद्र राठोड, गजानन राऊत, केशव खोटे, मुन्ना खान, अब्दुल वहाब शेख चांद, बबन ठाकरे, साईनाथ सुरुशे, प्रल्हाद सुरुशे यांच्या पथकाने केली.

...तर गाळ्यांचा होणार फेरलिलाव
अधिमुल्य रक्कम थकीत असलेल्या गाळेधारकांना रक्कम भरण्याकरिता ७ फेब्रुवारी पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. विहित वेळेत थकीत रक्कम न भरणाऱ्या गाळ्यांचा फेरलिलाव करुन गाळे हर्राशी करण्यात येणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 

 

Web Title: 32 seals struck; Proceedings of Washim Nagar Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम