मालेगाव शहर विकासासाठी ३.२० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:41 AM2021-05-09T04:41:53+5:302021-05-09T04:41:53+5:30

मालेगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमदार अमित झनक यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२०-२१ वार्षिक आराखड्यातील नगरोत्थान ...

3.20 crore for Malegaon city development | मालेगाव शहर विकासासाठी ३.२० कोटींचा निधी

मालेगाव शहर विकासासाठी ३.२० कोटींचा निधी

Next

मालेगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमदार अमित झनक यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२०-२१ वार्षिक आराखड्यातील नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरातील विकासकामासाठी एक कोटीचा निधी दिला होता. त्यापाठोपाठ नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजने अंतर्गत शहरातील विविध कामांसाठी तीन कोटी वीस लाख रुपयांचा निधी खेचून आणला आहे. यामुळे मालेगांव शहरवासी व कार्यकर्त्यांमध्येसुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

००००

अशी आहेत प्रस्तावित कामे

यामध्ये जैन धर्मशाळेला संरक्षक भिंत, शहरातील विविध प्रभागांमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते, नाल्या, तसेच प्रभाग क्रमांक १७ मध्ये नवीन हिंदू समशानभूमीमध्ये दोन दहन शेड, तार कंपाऊंड व हायमस्क लाईट लावणे, कब्रस्तानमध्ये हायमास्ट लाईट लावणे, बियाणी नगर, शिक्षक कॉलनी, रामनगर या भागातील खुल्या जागेचा विकास करणे या व्यतिरिक्त शहरातील विविध भागात रस्ते नाल्या आदी कामे होणार असल्याने शहराच्या विकासासाठी मोठा हातभार लागणार आहे.

Web Title: 3.20 crore for Malegaon city development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.