३३ हजार कुटुंबियांशी प्रशासनाने साधला ‘संवाद’!
By admin | Published: October 4, 2016 02:51 AM2016-10-04T02:51:35+5:302016-10-04T02:51:35+5:30
‘भेटी-गाठी स्वच्छतेसाठी’ अभियानाचा समारोप ; प्रसार-प्रसिद्धीसाठीची चार वाहने झाली बंद.
वाशिम, दि. 3- स्वच्छ भारत मिशनअंतर्गत 'भेटी-गाठी स्वच्छतेसाठी' या उपक्रमाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाशिम जिल्ह्यात शौचालय नसलेल्या ३२ हजार ७८८ कुटुंबियांशी अधिकारी व पदाधिकार्यांनी संवाद साधला.
राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख गृहभेटी, हा आगळावेगळा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात शौचालय नसलेल्या ३0 हजार कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्व पटवून देण्याचे उद्दिष्ट वाशिम जिल्हा परिषदेने निश्चित केले होते. २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान अधिकारी व पदाधिकार्यांनी गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या ३२ हजार ७८८ कुटुंबियांच्या भेटी घेऊन शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. दरम्यान, मध्यंतरी जिल्हा स्वच्छता कक्षाकडे प्रचार-प्रसिद्धीसाठी केवळ एकच वाहन असल्याने या अभियानाची गती मंदावली होती. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वृत्त प्रकाशित करून वरिष्ठांचे लक्ष वेधल्यानंतर चार वाहने मिळाली. त्यामुळे प्रचार-प्रसिद्धीला वेग आला. आता २ ऑक्टोबरला या अभियानाचा समारोप झाल्याने ही चार वाहनेदेखील बंद करण्यात आली. त्यामुळे पुन्हा अभियानाची गती मंदावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान अधिकारी व पदाधिकार्यांनी गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या कुटुंबियांकडे शौचालय बांधकामाचा आग्रह धरला. या अभियानादरम्यान जवळपास १८00 शौचालयांचे बांधकाम सुरू झाले. सन २0१६-१७ या वर्षात जिल्ह्यात ३५ हजार ८६५ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. वाशिम तालुक्यात ४0७६, मालेगाव तालुक्यात ४१३७, रिसोड तालुक्यात ४१४१, मंगरुळपीर तालुक्यात ५८८७, मानोरा ७९९६ व कारंजा तालुक्यात सर्वाधिक ९६२८ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हगणदरीमुक्त गाव मोहिमेत दिरंगाई करणार्या अधिकारी- कर्मचार्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकार गणेश पाटील यांनी दिले आहेत. १२ हजार रुपयांचे अनुदान संबंधित पात्र लाभार्थीं देण्यात दिरंगाई झाली तर शिस्तभंगाची कारवाईदेखील केली जाणार आहे. यामुळे कामचुकार कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत. ह्यभेटी गाठी - स्वच्छतेसाठीह्ण या अभियानादरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी ग्रामस्थांच्या दारी पोहोचले. परिणामी, गृहभेटी संवाद अभियानांतर्गतची उद्दिष्टपूर्ती झाली. आता चार वाहने बंद करण्यात आल्याने अभियानावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.