सहा एकर परिसरात ३५०० रोपांची लागवड!
By admin | Published: May 17, 2017 02:12 PM2017-05-17T14:12:09+5:302017-05-17T14:12:09+5:30
पारवा येथील ग्रामस्थांचा पुढाकार : वृक्षसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न
पारवा येथील ग्रामस्थांचा पुढाकार : वृक्षसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न
वाशिम : जिल्ह्यातील पारवा (ता. मंगरूळपीर) येथील ग्रामस्थांनी वृक्षसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न चालविले असून सहा एकर परिसरात विविध प्रजातींच्या ३५०० रोपांची लागवड त्यांनी केली आहे. त्यांचे हे कार्य जिल्ह्यातील इतर गावांसाठ प्रेरणादायी ठरले आहे.
जेमतेम दोन हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या पारवा या गावाने वृक्षलागवड आणि संवर्धनाची गरज ओळखून वृक्षलागवड मोहिमेत स्वत:ला झोकून दिले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत गावात सहा एकर शेती केवळ रोपांच्या लागवडीकरिता राखून ठेवण्यात आली. त्यावर तब्बल ३५०० रोपांची लागवड करण्यात आली असून इतरही गावांनी पारवाचे अनुकरण करून वृक्षलागवड मोहिमेस बळकटी द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी केले आहे.