जिल्ह्यातील ३५१ युवकांना मिळाला रोजगार

By admin | Published: May 18, 2017 01:17 AM2017-05-18T01:17:24+5:302017-05-18T01:17:24+5:30

ग्रामीण कौशल्य विकास योजना : विनामुल्य प्रशिक्षण

351 youths get jobs in the district | जिल्ह्यातील ३५१ युवकांना मिळाला रोजगार

जिल्ह्यातील ३५१ युवकांना मिळाला रोजगार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचा एक भाग म्हणून राबविणाऱ्या येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत गोरगरीब युवकांना तीन महिने विनामुल्य प्रशिक्षण मिळत आहे. या प्रशिक्षणातून रोजगारासाठी सक्षम ठरलेल्या जिल्ह्यातील ३१५ युवकांना गत वर्षभरात विविध क्षेत्रात रोजगार मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्ती अभियानाचाच एक भाग म्हणून दीन दयाळ उपाध्याय - ग्रामीण कौशल्य विकास योजना ही महत्वाकांक्षी योजना शासनाने सुरू केली आहे. ग्रामीण भागातील १८ ते ३५ वयोगटातील युवकांची मुळात असलेल्या कौशल्याची कार्यक्षमता वाढवून त्यांना विविध संघटीत क्षेत्रात वेतनी रोजगार उपलब्ध करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मुलन करण्याबरोबरच दहावी उत्तीर्ण असलेल्या गोरगरीब युवक-युवतींना संघटीत क्षेत्रात वेतनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हानिहाय उद्दिष्ट दिले जाते. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील युवक-युवती, स्वयंसहायता समूहाच्या सदस्यांच्या कुटुंबातील युवक-युवती किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस काम केलेल्या लाभार्थींचा मुलगा-मुलगी या योजनेसाठी पात्र आहेत. पात्र युवक-युवतींसाठी पंचायत समिती स्तरावर मेळावा घेऊन तीन महिने मुदतीच्या विनामुल्य प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. वाशिम जिल्ह्यात रोजगार व प्रशिक्षण देण्यासाठी तीन संस्थांची निवड शासनातर्फे झाली असून, सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३१५ जणांना ‘रोजगार’ देण्याचे उद्दिष्ट होते. मंगरूळपीर पंचायत समितीने सर्वप्रथम पुढाकार घेत ११२ युवक-युवतींना प्रशिक्षित केले. या ११२ जणांनादेखील विविध संघटित क्षेत्रात वेतनी रोजगार मिळाला आहे. उर्वरीत २०३ युवक-युवती हे पाच पंचायत समिती क्षेत्रातील आहेत. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाला सुरूवात होत नाही; तोच मंगरूळपीर पंचायत समितीने मेळावा घेऊन ५८ युवक-युवतींची प्रशिक्षणासाठी निवड केली. या सर्वांना तीन महिने विनामुल्य प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणानंतर विविध संघटित क्षेत्रात वेतनी रोजगार मिळेल, अशी माहिती मंगरूळपीर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) भाऊसाहेब बेलखेडकर यांनी दिली.

असे आहे तीन महिने विनामुल्य प्रशिक्षण

ग्रामीण भागातील पात्र युवक-युवतींना शासनातर्फे तीन महिन्यांचे विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते. इंग्रजीसह मु्ख्य भाषेचे पायाभूत ज्ञान, युवकांमधील विविध कौशल्य क्षमतेचा विकास करणे, क्षमता बांधणी, संभाषण कौशल्य, व्यावहारिक ज्ञान आदींसंदर्भात दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. एक महिन्याचे प्रशिक्षण हे संबंधित संघटित क्षेत्रातील कंपनीमध्ये ‘आॅन दि स्पॉट’ या पद्धतीने दिले जाते. या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जातो. या प्रशिक्षणातून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३१५ जणांना वेतनी रोजगार मिळाला आहे.

Web Title: 351 youths get jobs in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.