३६ जणांची कोरोनावर मात; ९ पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:27+5:302021-06-30T04:26:27+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी नव्याने ९ रुग्ण आढळून आले, तर ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम, मानोरा व मालेगाव तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. रिसोड तालुक्यात १, मंगरूळपीर तालुक्यात ५, कारंजा तालुक्यात ३, असे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१,३९७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०,५६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
००००
२०९ सक्रिय रुग्ण
रविवारच्या अहवालानुसार नव्याने ९ रुग्ण आढळून आले, तर ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात, असे एकूण २०९ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
एका मृत्यूची नोंद
मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या आणखी एका मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ६१९ जणांचे मृत्यू झाले.