३६ जणांना भूखंड खाली करण्याच्या नोटीस पारीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 08:24 PM2017-08-11T20:24:56+5:302017-08-11T20:26:32+5:30

मंगरुळपीर : विर भगतसिंग चौक, बस स्थानक चौक, नासेरजंग चौक, नगर भवन परिसर मधील एकून ३६ भूखंडधारकांचा करार संपला. त्यामुळे थकीत भाडे भरून त्वरीत भूखंड खाली करावे. अशा नोटीस नगरपालिका प्रशासनाने पारीत केल्या आहे. यामुळे नेमकी पालिका प्रशासन काय कार्यवाही करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

36 people changed notice to land plots | ३६ जणांना भूखंड खाली करण्याच्या नोटीस पारीत 

३६ जणांना भूखंड खाली करण्याच्या नोटीस पारीत 

Next
ठळक मुद्दे३६ भूखंडधारकांचा करार संपलानोटीस : थकीत भाडे भरून त्वरीत भूखंड खाली करावेपालिका प्रशासन नेमकी काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष 

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : विर भगतसिंग चौक, बस स्थानक चौक, नासेरजंग चौक, नगर भवन परिसर मधील एकून ३६ भूखंडधारकांचा करार संपला. त्यामुळे थकीत भाडे भरून त्वरीत भूखंड खाली करावे. अशा नोटीस नगरपालिका प्रशासनाने पारीत केल्या आहे. यामुळे नेमकी पालिका प्रशासन काय कार्यवाही करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
नगर पालिका अत्यंत अल्प दरात आपल्या ताब्यातील भूखंड काही वषार्पूर्वी करारावर अल्प भाडेतत्वावर लघुव्यवसायिकांना दिलेले आहे. या सर्व जागेवर लघुव्यवसाय सुरू सुध्दा आहेत. परंतू जागेचे भाव गगनाला भिडल्याने अनेकांनी पालिका प्रशासनाला अनभिज्ञ ठेवून हे भूखंड परस्पर विक्री व्यवहार किंवा पोटभाडेकरू ठेवून अव्वाच्या सव्वा पैसा लाटला असल्याची खमंग चर्चा रंगली आहे. उशीरा का होईना परंतू पालिका प्रशासनाला जाग आली.परिणामी पालिकेने करारनाम्यावर असलेले गाळे व भूखंडधारकांना थकीत भाडे त्वरीत भरून गाळे आणि भूखंड खाली करण्याचे आदेशाच्या नोटीसी देण्याचा धडाका लावला. यामुळे नगरपालिका मालमत्ता परस्पर व्यवहार करणा?्यात धांदल उडाली आहे. जवळ-जवळ सर्वच भूखंडधारकांचे करार सन २०११ मध्ये संपले आहेत. अनेकांच्याकडे वषार्नुवषेर्चे भाडे सुध्दा थकीत आहे. व्यापारी संकुल मधील ४७ गाळेधारक, त्यासमोरच असलेले २० भूखंडधारक, जुने बस स्थानक परीसरातील ३९ भूखंडधारक यांना नोटीसी बजावल्या नंतर प्राप्त झालेल्या माहितीनुसार विर भगतसिंग चौकातील १९ , बसस्थानक परीसरातील ११ , नगरभवन परीसरातील ५ व नासेरजंग चौकातील १ अशा एकून ३६ भूखंडधारकांच्या नावे पालिका प्रशासनाने नोटीसी पारीत केल्या आहे. अद्याप या सर्व भूखंडधारकांना नोटीसी मिळाल्या की नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. 

Web Title: 36 people changed notice to land plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.