३६० कृषीपंप जोडण्या रखडल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:42 AM2021-05-19T04:42:29+5:302021-05-19T04:42:29+5:30
०००० प्रलंबित कामांचा आढावा वाशिम : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या प्रलंबित कामांचा आढावा तसेच कोरोनाकाळात करावयाच्या ...
००००
प्रलंबित कामांचा आढावा
वाशिम : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या प्रलंबित कामांचा आढावा तसेच कोरोनाकाळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने घेतला.
००
कूपनलिका गणनेचे काम प्रभावित
वाशिम: जिल्ह्यात समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी गावात कूपनलिका आणि विहिरींची गणना केली जात होती. मात्र, सद्यकाळात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपरोक्त कामे प्रभावित झाली आहेत.
००००
भौरद येथे ५६ कोरोना रुग्ण आढळले
वाशिम : मालेगाव तालुक्यातील भौरद येथे मंगळवार, १८ मे रोजी ५६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला. संदिग्ध नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच चाचणी करण्यावर भर दिला जात आहे.
००००००
नव्या बॅरेजेसच्या मंजुरीची प्रतीक्षा
वाशिम : जिल्ह्यातील अडाण नदीवर बॅरेज निर्मितीचा प्रस्ताव आहे. या बॅरेजला सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी केव्हा मिळणार, याकडे लक्ष लागून आहे.