समाधान शिबिरात ३६६ तक्रारींचे निवारण

By admin | Published: June 25, 2017 08:59 AM2017-06-25T08:59:21+5:302017-06-25T08:59:21+5:30

समाधान शिबिरामध्ये वाशिम तालुक्यातील ९२, रिसोड तालुक्यातील २१६ व मालेगाव तालुक्यातील ५८ तक्रारींचे निवारण करण्यात आले.

366 redressal of grievances in the solution camp | समाधान शिबिरात ३६६ तक्रारींचे निवारण

समाधान शिबिरात ३६६ तक्रारींचे निवारण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: स्थानिक वाटाणे लॉन येथे शनिवारी झालेल्या वाशिम उपविभागस्तरीय विस्तारित समाधान शिबिरामध्ये वाशिम तालुक्यातील ९२, रिसोड तालुक्यातील २१६ व मालेगाव तालुक्यातील ५८ तक्रारींचे निवारण करण्यात आले.
राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरास जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
तक्रारदाराला तातडीने न्याय मिळवून विस्तारित समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. समाधान शिबिरात दाखल काही तक्रारींवर संबंधित विभागांकडून विहित कालावधीत उत्तरे प्राप्त होणे अपेक्षित आहे; मात्र काही तक्रारींवर संबंधित विभागांकडून उत्तरे प्राप्त न झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशाप्रकारे दिरंगाई करणाऱ्या व समाधान शिबिरास अनुपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री ना. राठोड यांनी यावेळी दिल्या.

Web Title: 366 redressal of grievances in the solution camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.