वाशिम जिल्ह्यातील ३७ जलस्त्रोत दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:37 PM2018-08-10T16:37:04+5:302018-08-10T16:38:06+5:30
वाशिम - ग्रामपंचायत स्तरावर जुलै महिन्यात करण्यात आलेल्या पाणी नमुने तपासणीत जिल्ह्यातील जवळपास ३७ जलस्त्रोत दूषित आढळून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - ग्रामपंचायत स्तरावर जुलै महिन्यात करण्यात आलेल्या पाणी नमुने तपासणीत जिल्ह्यातील जवळपास ३७ जलस्त्रोत दूषित आढळून आले आहेत.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार उद्भवण्याची शक्यता अधिक असते. दुषित पाण्याचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नको, म्हणून पाणीनमुने रासायनिक व अणूजीव तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळांकडे पाठविले जातात. २०१३ पासून वाशिम जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचा कारभार सुरू झाला आहे. या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या पाणी नमुन्याची तपासणी करून अहवाल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जातो. जुलै २०१८ मध्ये पाणीनमुने रासायनिक व अणुजीव तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेकडे प्राप्त झाले होते. यापैकी जवळपास ३७ जलस्त्रोत दूषित आढळून आले. दूषित जलस्त्रोताचा पिण्यासाठी वापर करण्यात येऊ नये, अशा सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. जलस्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडरचा आवश्यक त्या प्रमाणात वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या.