३७३ हेल्थ केअर, फ्रंट लाईन वर्कर्सनी लसीचा पहिला डोस घेतलाच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:50+5:302021-07-16T04:27:50+5:30
संतोष वानखडे वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात असताना, प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकारी व ...
संतोष वानखडे
वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात असताना, प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नसल्याची माहिती समोर येत आहे. ७३ हेल्थ केअर वर्कर्स आणि ३०० फ्रंट लाईन वर्कर्स् अशा एकूण ३७३ जणांनी लसीचा पहिला, तर ९,५०६ जणांनी दुसरा डोस घेतला नाही.
देशात मार्च २०२०पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण ७,१४३ जणांना, तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत ३२ हजार जणांना कोरोना संसर्ग झाला. कोरोनावर एकमेव व प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावरही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून हेल्थ केअर वर्कर्स, १२ फेब्रुवारीपासून फ्रंट लाईन वर्कर्स यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याला सुरुवात झाली. ८,३४३ हेल्थ केअर वर्कर्सनी लसीकरणासाठी नोंदणी केली असून, यापैकी ७३ जणांनी पहिला, तर २,६३२ जणांनी ११ जुलैपर्यंत दुसरा डोस घेतला नाही. १६ हजार १५२ फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी झाली असून, यापैकी ३०० जणांनी पहिला, तर ६,८७४ जणांनी दुसरा डोस घेतला नाही.
०००००००००००
कोट बॉक्स
कोरोनावर प्रभावी व एकमेव उपाय म्हणून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. ज्या हेल्थ केअर, फ्रंट लाईन वर्कर्सनी पहिला व दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी शक्य तेवढ्या लवकर लसीचा डोस घ्यावा.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
००००००००००००००
प्रकार नोंदणीपहिला डोसदुसरा डोस
हेल्थ केअर वर्कर्स ८३४३ ८२७० ५६३८
फ्रंट लाईन वर्कर्स १६१५२ १५८५२ ८९७८
०००००००००००००
लस न घेतलेले हेल्थ केअर वर्कर्स ७३
लस न घेतलेले फ्रंट लाईन वर्कर्स ३००