शेतकऱ्यांची ४ महिन्याची मेहनत व्यर्थ ; खर्च जास्त उत्पादन कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 12:20 PM2020-10-20T12:20:15+5:302020-10-20T12:20:31+5:30
Washim District, Farmer लावलेला खर्च न निघाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
- नंदकिशाेर नारे
वाशिम : जिल्हयात झालेल्या जाेरदार पावसासह आलेल्या विविध संकटामुळे शेतकरी पूर्णपणे खचला असून ४ महीन्यापर्यंत जाेपासलेले पीक पाहीजे त्या प्रमाणात न आल्याने खर्च जास्त उत्पादन कमी आले आहे. यामुळे शेतकरी पुढील शेतीचे नियाेजन कसे करावे या चिंतेत सापडला आहे.
खरीपात साेयाबीनची पेरणी करण्याकरीता सावकारासह ईतरांकडून कर्ज घेऊन शेतीत साेयाबीनचे नियाेजन केले. एकरी १७ ते १८ हजार रुपयांच्या जवळपास खर्च झाला. उत्पादन मात्र एकरी ४ ते ६ आल्याने शेतकऱ्यांचा खर्च ही निघाला नाही. ज्या शेतकऱ्याला एकरी ४ पाेते साेयाबीन उत्पादन झाले त्याला ३१०० रुपये खिशातून भरावे लागले. ज्यांना ५ पाेते झाले त्यांना ना नफा ना ताेटा मेहनत व्यर्थ तर ज्यांना एकरी ६ पाेते झाले त्यांना ४ महीने मेहनत केल्यानंतर साडेतीन ते ४ हजार रुपये खर्च जाता शिल्लक राहीले. आता शेतकऱ्याने पुढचे नियाेजन कसे करावे असा प्रश्न खुद्द शेतकरीच उपस्थित करीत आहे. अल्पभूधारक शेतकरी पूर्ण खचला.
साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यावेळी माेठा फटका बसला आहे. लावलेला खर्च सुध्दा न निघाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे माेडले आहे. लावलेला खर्च न निघाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. काेकलगाव परिसरात एकरी ३ ते ५ पाेत्याचा उतारा आला.
- रवी काळबांडे
शेतकरी, काेकलगाव
अल्पभुधारक शेतकऱ्याने ४ महीने मेहनत घेऊन खर्च ही नाही निघाला आता त्याने पुढील पिकांचे नियाेजन कसे करावे असा प्रश्न पडला आहे. लावलेला खर्च तर दूरच बल्की शेतकऱ्याच्या खिशातून पैसा गेला आहे. आमच्या परिसरात एकरी ४ साेयाबीनचा उतारा आला आहे. यामध्ये माझ्याकडे सव्वा एकर शेती आहे.
- पंडीत उत्तमराव गंगावणे, शेतकरी, देपूळ