शेलुबाजार येथे आणखी ४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:42 AM2021-05-19T04:42:25+5:302021-05-19T04:42:25+5:30

००० शिरपूर परिसरात इंटरनेटमध्ये व्यत्यय वाशिम : गत काही दिवसांपासून शिरपूर परिसरात इंटरनेट सेवेत वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. ...

4 more patients at Shelubazar | शेलुबाजार येथे आणखी ४ रुग्ण

शेलुबाजार येथे आणखी ४ रुग्ण

Next

०००

शिरपूर परिसरात इंटरनेटमध्ये व्यत्यय

वाशिम : गत काही दिवसांपासून शिरपूर परिसरात इंटरनेट सेवेत वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. मंगळवारीदेखील असाच प्रकार घडल्याने आपले याचा फटका बँक व कार्यालयीन कामकाजाला बसला.

00

किन्हीराजा परिसरात उघड्यावर शौचवारी

वाशिम : ग्रामीण भागात शौचालय उभारण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी आजही नागरिक गावातील रस्त्याच्या दुतर्फा शौचास बसत असल्याचे चित्र किन्हीराजा परिसरात दिसून येते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.

00

पार्डी टकमोर येथे आरोग्य तपासणी

वाशिम : वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथे आणखी चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल १८ मे रोजी पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

०००००

माहिती भरताना सेविकांची दमछाक

वाशिम : पोषण आहाराची माहिती पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली आहे. परंतु, या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा नसून, हिंदी व इंग्रजी भाषा असल्याने माहिती भरताना अंगणवाडी सेविकांची दमछाक होत आहे.

00००

कागदपत्रांमध्ये त्रुटी, कामे प्रलंबित

वाशिम : काही लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने वाशिम तालुक्यातील जवळपास ४० घरकुलांची कामे प्रलंबित राहिली आहेत. ही कामे विनाविलंब पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत.

०००

भर परिसरात पाणंद रस्त्याचे काम रखडले

वाशिम : भर जहॉंगीर जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पावसाळ्यात रस्ते चिखलमय होतात. पालकमंत्री योजनेतून या रस्त्याचे काम करण्याची मागणी गावातील शेतकºयांनी सोमवारी केली.

00000

दुकानांत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

वाशिम : निर्बंधामधून सुट मिळाली असून, वाशिम येथील बाजारपेठ काही दुकानांमध्ये गर्दी होत आहे. दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. कोरोनाचे गांभीर्य ओळखून नागरिक व दुकानदारांनी दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.

000

बँकांमधील गर्दी टाळण्याच्या सूचना (फोटो)

वाशिम : बँकांमध्ये तसेच बँक परिसरात गर्दी होत असून, यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका कायम असल्याचे दिसून येते. संभाव्य धोका कमी करण्यासाठी बँक परिसरात गर्दी करू नये, नागरिकांनी कोरोनाविषयक नियमाचे पालन करावे, अशा सूचना प्रशासनाने मंगळवारी दिल्या.

0000000000000000

अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्याची मागणी

वाशिम : रिसोड व मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. महसूल विभागाने लक्ष पुरवून संबंधित यंत्रणेला सर्वेक्षणाचे आदेश द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

000000000000000

शौचालयांसाठी रेती देण्याची मागणी

वाशिम : जिल्ह्यात शौचालयांचे बांधकाम पूर्ण करावे लागणार आहे. मात्र रेतीच उपलब्ध नसल्याने ही कामे प्रभावित होत आहेत. बांधकामासाठी रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभार्थीमधून होत आहे.

०००

Web Title: 4 more patients at Shelubazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.