४0 वर्षीय इसमाची शस्त्राने हत्या!
By admin | Published: July 9, 2017 09:49 AM2017-07-09T09:49:00+5:302017-07-09T09:49:00+5:30
गुप्तांग कापले; रिसोड येथील घटना.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : येथील ४0 वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना रिसोड ते लोणी रोडवरील साखरा फाट्यानजिक ८ जुलै रोजी सकाळी १0 वाजता उघडकीस आली आहे. गंभीर बाब म्हणजे या घटनेतील मृताचे चक्क गुप्तांग कापण्यात आले आहे.
यासंदर्भात नारायण हुंबाड यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांचा भाऊ गजानन हुंबाड हे ७ जुलै रोजी रात्री १0 वाजता संदीप पवार यांच्यासोबत मोटारसायकलने घरुन गेले होते, ते उशिरापर्यंंत परतले नाहीत. मृत गजानन हुंबाडचा विवाह गोभणी ये थील हरकळ येथील छाया हिच्यासोबत झाला होता. दरम्यान, २५ ऑ क्टोबर २0१६ रोजी छायाचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी गजाननवर खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्यास सहा महिने शिक्षा झाली होती. दरम्यान, पत्नीच्या माहेरकडून गजाननला वारंवार जीवे मारण्याच्या धम क्या मिळायच्या, असे मृताच्या भावाने फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे गजाननची हत्या संदीप पवार व त्याच्या अज्ञात साथीदारानेच केल्याचा संशयदेखील फिर्यादीने वर्तविला आहे. मृत गजानन हुंबाडच्या चेहर्यावर, दोन्ही डोळ्यांच्या भुवईवर, पोटावर, हातावरील मनगटावर धारदार शस्त्रांनी वार झालेले असून, गुप्तांग कापून शरीराच्या वेगळे करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित व्यक्तीस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, घटनास्थळावर श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता.