४०० कृषीपंप जोडण्या रखडल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:38 AM2021-04-19T04:38:06+5:302021-04-19T04:38:06+5:30
00 प्रलंबित कामांचा आढावा वाशिम : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य विभागांतर्गत येणाºया प्रलंबित कामांचा आढावा तसेच कोरोनाकाळात करावयाच्या ...
00
प्रलंबित कामांचा आढावा
वाशिम : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य विभागांतर्गत येणाºया प्रलंबित कामांचा आढावा तसेच कोरोनाकाळात करावयाच्या उपाययोजनेचा आढावा जिल्हा परिषद शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी शनिवारी ऑनलाईन पद्धतीने घेतला.
०००
केनवड येथे आरोग्य तपासणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील केनवड येथे आणखी पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच चाचणी करण्यावर भर दिला जात आहे.
०००००
वर्गखोली दुरूस्तीसाठी निधीची प्रतीक्षा
वाशिम : जिल्ह्यातील जवळपास १००जिल्हा परिषद शाळेच्या १२० वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी निधीची आवश्यक आहे. शासनाकडून निधी केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा कायम आहे.
०००००
पोषण आहार योजनेचा आढावा
वाशिम : अंगणवाडी केंद्रातील बालकांना घरपोच पोषण आहार पुरविण्यात येत आहे. या योजनेचा आढावा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने बालविकास प्रकल्प अधिकाºयांकडून शुक्रवारी घेतला.