लॉकडाऊनच्या शंभर दिवसांत ४०० कोटींची उलाढाल झाली ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:39 AM2021-03-24T04:39:18+5:302021-03-24T04:39:18+5:30
साधारणत: मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव सुरू झाला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन ...
साधारणत: मार्च महिन्यात देशात कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव सुरू झाला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी लागू झाली. त्यामुळे जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय बंद पडल्याने ४०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. तर लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या दीड, दोन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात जवळपास ७०० ते ७५० कोटींचे नुकसान झाल्याचेही व्यापाºयांशी केलेल्या चर्चेवरून दिसून येते. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये आलेली शिथिलता आणि मिशन बिगेन अगेनमुळे अर्थ व्यवस्थेत सुधार होऊ लागला. दरम्यान, आता कोरोना संसर्ग वाढल्याने पुन्हा विविध व्यवसांयावर बव्हंशी निर्बंध आल्याने अडचणीत वाढत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात लॉकडाऊनपूर्वी सुरू असलेले ८ उद्योग आणि २१० रोजगार बंद पडले. लॉकडाऊननंतर त्यातील ७ उद्योग आणि १७० रोजगार सुरू झाले होते. आता त्यात आणखी वाढ झाली आहे.
------------
मे महिन्यानंतरच्या शिथिलतेने दिलासा
सुरूवातीच्या काळात जिल्ह्यात दीड महिना प्रभावी अंमलबजावणी असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व दुकाने, व्यवसाय ठप्प पडले. त्यानंतर जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये झाल्याने बहुतांश व्यवसाय, दुकानांना ठराविक वेळेत सूट देण्यात आली. मे महिन्याच्या अखेरपासून तर शॉपिंग मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट, सिनेमागृह, जिम्नॅशियम, सलून व ब्युटीपार्लर, बार, खासगी प्रवासी वाहतूक आदी मोजके व्यवसाय, धंदे वगळता उर्वरीत सर्व दुकाने, व्यवसायांचे दरवाजे खुले झाले. सलून व ब्युटीपार्लरला जून अखेरीस परवानगी मिळाली.
------------
लॉकडाऊनपूर्वी सुरू असलेले उद्योग -०८
लॉॅकडाऊनपूर्वी सुरू असलेले रोजगार-२१०
----------
लॉकडाऊनंतर सुरू झालेले उद्योग-०७
लॉकडाऊनंतर सुरू झालेले रोजगार-१७०