कृषी पंपांच्या ४00 जोडण्या रखडल्या!
By admin | Published: December 4, 2015 02:47 AM2015-12-04T02:47:42+5:302015-12-04T02:47:42+5:30
मालेगाव तालुक्यात धडक सिंचन योजनेचे १00 प्रस्ताव तयार.
अमोल कल्याणकर / मालेगाव (जि. वाशिम) : शेतकर्यांना तातडीने कृषीपंप जोडणी देण्याचा डंका पिटणार्या महावितरण यंत्रणेचे पितळ आता उघडे पडत आहे. दीर्घ कालावधीनंतरही मालेगाव तालुक्यातील ४00 शेतकर्यांच्या विहिरीवर कृषीपंपाचे मीटर बसू शकले नाही. गत काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलल्याने शेती उत्पादनात चढ-उतार येत आहे. पारंपरिक शेती परवडत नसल्याने शेतकरी सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देत आहेत. शासकीय योजना आणि वैयक्तिक स्वरुपात शेतात विहिरी खोदून शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत जोडणी आवश्यक आहे. कृषीपंप जोडणी मिळण्यासाठी महावितरण कार्यालयात कोटेशन भरून शेतकर्यांना प्रस्ताव सादर करावा लागतो. मालेगाव तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी कृषीपंप जोडणीसाठी प्रस् ताव सादर केलेले आहेत. ३0 नोव्हेंबरपर्यंंत ४00 कृषीपंप जोडण्या रखडलेल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे पाणी असूनही शेतकर्यांना सिंचन करता येत नसल्याची परिस्थिती आहे. यावर्षी मालेगाव तालुक्यावर पाऊस रुसला. त्यामुळे खरीप हंगामात शे तकर्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. मेडशी, रिधोरा, किन्हीजा व अन्य काही भागातील शेतकर्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. मूग व उडदाचे उत्पादन निच्चांकी पातळीवर आले. सोयाबीनवर भिस्त अस ताना सोयाबीनच्या उत्पादनातही कमालिची घट आली. एकरी ८ ते १0 िक्ंवटल उत्पादनाऐवजी यावर्षी एक ते तीन क्विंटलच्या आसपास सोयाबीनचा उतारा आला. त्यामुळे शेतकर्यांचा लागवड खर्चही वसूल झाला नाही. ही कसर रब्बी हंगामाच्या गहू, हरभरा आदी पिकांच्या उत्पादनातून भरून काढण्यासाठी शेतकरी सिंचनावर भर देत आहे; मात्र कृषीपंप जोडणी मिळण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने पाणी असूनही सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ ४00 शेतकर्यांवर आली. थकीत बिलापोटी वीजजोडणी कापणार्या वीज वितरण कंपनीने आपल्या क र्तव्यातही तेवढेच तत्पर असणे शेतकर्यांना अपेक्षित आहे. शेतकर्यांच्या किरकोळ प्रश्नांवरून रान उठविणार्या अनेक संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनीदेखील चुप्पी साधल्याने 'बेगडीपण' चव्हाट्यावर येत आहे.