राज्यातील ४०७ शेतकरी गटांना प्रलंबित निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:24 PM2020-03-17T12:24:28+5:302020-03-17T12:24:35+5:30

कृषी विभागाने १४ मार्च रोजी १० कोटींच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे.

407 farmers groups in the state will receive pending funds | राज्यातील ४०७ शेतकरी गटांना प्रलंबित निधी मिळणार

राज्यातील ४०७ शेतकरी गटांना प्रलंबित निधी मिळणार

Next

वाशिम : गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे या योजनेंतर्गत राज्यात सन २०१७-१८ मधील १९६ आणि सन २०१८-१९ मधील २११ अशा एकूण ४०७ गटांची निवड झाली होती. तथापि पुरेसा निधी नसल्याने शेतकरी ृगटांची प्रस्तावित कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. सदर कामे पूर्ण होण्यासाठी कृषी विभागाने १४ मार्च रोजी १० कोटींच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे. यामुळे वाशिम जिल्ह्यातील तीन शेतकरी गटासह राज्यातील ४०७ गटांची उर्वरीत कामे पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पीक उत्पादन वाढविण्यासाठी निविष्ठा, प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, काढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पणन आदी बाबी महत्वाच्या ठरतात. राज्यातील शेतकऱ्यांची जमिनधारणा कमी असल्याने शेतकºयांच्या उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी सामुहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पद्धती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता लक्षात घेता, राज्यात ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीस चालना देणे’ ही योजना सन २०१७-२०१८ पासून राबविण्यात येत आहे. प्रकल्प आराखड्यानुसार शेतकरी गटांना प्रस्तावित कामे करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. राज्यात सन २०१७-१८ या वर्षात १९६ आणि २०१८-१९ या वर्षात २११ शेतकरी गटाची निवड झाली होती. प्रकल्प आराखड्यातील कामांसाठी यापूर्वी ६० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. उर्वरीत १० कोटींचा निधी मिळण्यास विलंब झाल्याने शेतकरी गटांची उर्वरीत कामे खोळंबली होती. उर्वरीत निधी देण्याची मागणी शेतकरी गटांनी कृषी विभागाकडे केली होती. शेतकरी गटांची मागणी लक्षात घेता राज्याच्या कृषी विभागाने १४ मार्च रोजी १० कोटींच्या निधी वितरणास मान्यता दिली. यामुळे वाशिम जिल्ह्यातील तीन गटासह राज्यातील ४०७ शेतकरी गटांची प्रकल्प आराखड्यातील पुढील कामे मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शासन निर्णयानुसार वाशिम जिल्ह्यात पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी सांगितले.

Web Title: 407 farmers groups in the state will receive pending funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.