कारंजातून ४१ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 08:16 PM2017-09-26T20:16:27+5:302017-09-26T20:16:38+5:30

कारंजा लाड - गुप्त माहितीच्या आधारे नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील कारंजा शहरालगतच्या चौफुलीवर कारंजा पोलिसांनी ४१ लाख रुपये किंमतीचा गुटखा २६ सप्टेंबरच्या पहाटेदरम्यान जप्त केला.

41 lakh gakka seized from Karanja | कारंजातून ४१ लाखांचा गुटखा जप्त

कारंजातून ४१ लाखांचा गुटखा जप्त

Next
ठळक मुद्देशहरालगतच्या चौफुलीवर कारंजा पोलिसांनी जप्त केला गुटखा जप्त केलेला मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन अकोला यांचेकडे सुपूर्द 

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड - गुप्त माहितीच्या आधारे नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील कारंजा शहरालगतच्या चौफुलीवर कारंजा पोलिसांनी ४१ लाख रुपये किंमतीचा गुटखा २६ सप्टेंबरच्या पहाटेदरम्यान जप्त केला.
नागपूर-औरंगाबाद महामार्गावर एका वाहनाने गुटखा येत असल्याची गुप्त माहिती कारंजा शहर पोलीस स्टेशनला मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले व कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार एम.एम. बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने शहरानजीकच्या सागर लॉनजवळील चौैफुलीवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास नाकाबंदी केली. एम.एच २९  टी. १५४३ क्रमांकाच्या  दहा टायरच्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ४१ लाख ६ हजार ७०० रुपये किंमतीचे सागर पान मसाला व सागर गुटख्याचे प्लास्टीकचे पोते आढळून आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ लाख रुपये किंमतीचा ट्रक व ४१ लाख ६ हजार ७०० रुपये किंमतीचा गुटखा असा एकूण ५३ लाख ६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालक अब्दुल सलाम, अब्दुल वाहब (२९), रा.पेन्शन लाईन सदार बाजार नागपूर व क्लिनर मोहम्मद तोसिफ, मोहम्मद युनुस (२६) रा. विनोबा भावे नगर नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन अकोला यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.

Web Title: 41 lakh gakka seized from Karanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.