मंगरुळपीर तालुुक्यातून ४१ मुस्लिम बांधव हजला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 04:22 PM2019-07-28T16:22:33+5:302019-07-28T16:22:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  आसेगाव (वाशिम) : मंगरुळपीर तालुक्यातील ४१ मुस्लिम बांधव मुस्लिम धर्मातील पाच कर्तव्यांपैकी एक असलेल्या हजयात्रेला जात असून, यातील सात जण रविवार २८ जुलै रोजी हजयात्रेला रवाना झाले.

41 Muslim brothers will go for haj yatra from Mangarulpir taluka | मंगरुळपीर तालुुक्यातून ४१ मुस्लिम बांधव हजला जाणार

मंगरुळपीर तालुुक्यातून ४१ मुस्लिम बांधव हजला जाणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
आसेगाव (वाशिम) : मंगरुळपीर तालुक्यातील ४१ मुस्लिम बांधव मुस्लिम धर्मातील पाच कर्तव्यांपैकी एक असलेल्या हजयात्रेला जात असून, यातील सात जण रविवार २८ जुलै रोजी हजयात्रेला रवाना झाले. या भाविकांचा समाजबांधवांकडून सत्कार करण्यात आला. 
मुस्लिम धर्मानुसार कलमा-ए-तौहीद, पाच वेळची नमाज, रमजान मधील रोजे (उपवास), श्रीमतांंवर कर, तसेच आयुष्यात एकवेळा हज यात्रा करणे कर्तव्य मानल्या जाते. हजयात्रा करणाºयावरच अल्लाहची कृपादृष्टी असते, असेही मानले जाते. त्यामुळे दरवर्षी लाखो मुस्लिम भाविक हजयात्रा करतात. यंदा मंगरूळपीर तालुक्यातून ४१ भाविक पवित्र हजयात्रेला जाणार आहेत. नागपूर येथून २७ जुलैपासून भाविकांचे हजकडे प्रस्थान सुरू झाले असून, २९ जुलैपर्यंत सर्व भाविक हजयात्रेला रवाना होणार आहेत. त्यापैकी ७ जण आज आसेगाव येथून नागपूरकडे रवाना झाले. यामध्ये मनवर खान, हाजी महबूब खान आणि मोहम्मद खान हे सपत्नीक जात असून, त्यांच्यासोबत डॉ. मोबीन खान मनवर खान हेसुद्धा हजयात्रेला जात आहेत. यापैकी हाजी महबूब खान, सुबहान खान यांची ही सपत्नीक हजयात्रेची दुसरी वेळ आहे. हजयात्रेला जाणारे भाविक नमाज अदा खासगी वाहनांनी नागपूरक डे रवाना झाले. हे भाविक २९ जुलै रोजी जद्दाह येथील विमानतळावरून हजयात्रेला रवाना होतील होतील. 
 
 हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन  

 आसेगाव येथून हजयात्रेला जाणाºया मुस्लिम बांधवांना निरोप देण्यासाठी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कुंभी येथील एन. बी. शेळके शाळेचे संस्थापक अनंत शेळके, सरपंच सुभाष कावरे, विजय जाधव, पिंपळगावचे सरपंच विष्णू चव्हाण, गोपाल संगेकर, नांदगावचे पुंडलिक ठाकरे, रामेश्वर ठाकरे, डॉ. अनिल पोटकटारे, चिंचोलीचे दामोदर टेलर, शेख जलील, शिवनीचेतात्याराव ठाकरे स्थानिक विठ्ठल ठाकरे तसेच मंगरूळपीरचे शिक्षक इद्रिस खान, वाजिद खान, मजिद खान आदि हिंदू-मुस्लिम बांधवांनी आवर्जून उपस्थिती लावत हज यात्रेकरूंशी चर्चा के ली आणि शुभेच्छा देऊन हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले.

Web Title: 41 Muslim brothers will go for haj yatra from Mangarulpir taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.