वामन महाराज प्रगट दिन सोहळ्याची ४१ वर्षांची परपंरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:18 AM2021-02-21T05:18:52+5:302021-02-21T05:18:52+5:30

कोलार येथे दरवर्षी वामन महाराज संस्थानकडून वामन महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा केला जातो. यंदा २६ फेब्रुवारी ते ५ ...

41 year old tradition of Vaman Maharaj Revelation Day celebrations broken | वामन महाराज प्रगट दिन सोहळ्याची ४१ वर्षांची परपंरा खंडित

वामन महाराज प्रगट दिन सोहळ्याची ४१ वर्षांची परपंरा खंडित

Next

कोलार येथे दरवर्षी वामन महाराज संस्थानकडून वामन महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा केला जातो. यंदा २६ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे; परंतु जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी हा सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती वामन महाराज सेवाश्रमकडून देण्यात आली. यामुळे गेल्या ४१ वर्षांपासून सुरू असलेली वामन महाराज प्रगट दिन सोहळ्याची परपंरा खंडित झाली आहे. दरम्यान, यंदा २६ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान वामन महाराज प्रगट दिनानिमित्त आयोजित यात्रोत्सव रद्द करण्यात आला असला तरी, प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे केले जाणार आहेत. भाविकांनी नियमांचे पालन करून घरीच वामन महाराज प्रगट दिन सोहळा साजरा करण्याचे आवाहन वामन महाराज सेवाश्रमकडून करण्यात आले आहे.

Web Title: 41 year old tradition of Vaman Maharaj Revelation Day celebrations broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.