ट्रॅक्टर योजनेसाठी ४३२ अर्ज
By admin | Published: June 30, 2017 01:20 AM2017-06-30T01:20:08+5:302017-06-30T01:20:08+5:30
रिसोड : ‘उन्नत शेती -समृद्ध शेतकरी’ मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन २०१७-२०१८ अंतर्गत ट्रॅक्टर या वाहनासाठी तालुक्यातून ४३२ अर्ज कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : ‘उन्नत शेती -समृद्ध शेतकरी’ मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन २०१७-२०१८ अंतर्गत ट्रॅक्टर या वाहनासाठी तालुक्यातून ४३२ अर्ज कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत. ३० जून रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय रिसोड येथे ईश्वरचिठ्ठीतून लाभार्थी निवड केली जाणार आहे.
ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे तसेच अन्य अवजारांसाठी १५ मे २०१७ पर्यंत तालुका स्तरावर लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज मागविलेले होते. तालुक्यात ट्रॅक्टरसाठी ४३२ व इतर अवजारांसाठी ४०९ अर्ज प्राप्त झाले. सदरील अवजारांची ईश्वरचिठ्ठीद्वारे प्राध्यान्यक्रम यादी ३० जून रोजी दुपारी १ वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे निश्चित केली जाणार आहे. संबंधित लाभार्थींना काही दुरूस्ती असल्यास लेखी स्वरुपात तालुका कृषी अधिकारी कार्यालयास ३० जून २०१७ रोजी द्याव्या, असे आवाहन कृषी विभागाने केले. त्यानंतर ईश्वरचिठ्ठीतून लाभार्थी निवड केली जाणार आहे. लाभार्थी निवडीसाठी लाभार्थी व लोकप्रतिनिधींनी ३० जून रोजी दुपारी १ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.