वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे विद्युत पथदिव्यांची ४४ कोटींची थकबाकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 02:09 AM2018-03-24T02:09:00+5:302018-03-24T02:09:00+5:30

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीमधील पथदिव्यांच्या एकूण ७६४ जोडण्या असून, संबंधित ग्रामपंचायतींकडे ४४ कोटी ३ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, मार्चअखेर ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने ‘शून्य थकबाकी’ ही मोहीम हाती घेतली असून, या अंतर्गत ग्रामपंचायतींना नोटीस बजावून वीज देयक अदा करा; अन्यथा वीज जोडणी खंडित करू, असा इशारा देण्यात आला आहे.

44 crore of electricity street lights in the district of Gram Panchayat in Washim district! | वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे विद्युत पथदिव्यांची ४४ कोटींची थकबाकी!

वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे विद्युत पथदिव्यांची ४४ कोटींची थकबाकी!

Next
ठळक मुद्दे ग्रामपंचायतींना बजावल्या नोटीस वीज जोडणी खंडित करण्याचा इशारा 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीमधील पथदिव्यांच्या एकूण ७६४ जोडण्या असून, संबंधित ग्रामपंचायतींकडे ४४ कोटी ३ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, मार्चअखेर ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने ‘शून्य थकबाकी’ ही मोहीम हाती घेतली असून, या अंतर्गत ग्रामपंचायतींना नोटीस बजावून वीज देयक अदा करा; अन्यथा वीज जोडणी खंडित करू, असा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामविकास विभागातर्फे ८ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ‘अति-तत्काळ’ असा शेरा असलेले पत्र देण्यात आले असून, थकबाकी वसूल करण्याकडे लक्ष द्यावे, अशी  सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कधीही पथदिव्यांच्या वीज पुरवठा खंडित करू शकते. गैरसोय टाळण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४ व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून थकबाकीचा भरणा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील महावितरणच्या ग्राहकांकडे वीजबिलापोटी असलेली थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी महावितरण ‘शून्य थकबाकी’ ही मोहीम आक्रमकतेने राबवित आहे. घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसोबतच सार्वजनिक पाणी पुरवठा योजना, पथदिवे यांच्यावर वीजबिलापोटी असलेल्या चालू आर्थिक वर्षातील संपूर्ण थकबाकीसोबतच मागील आर्थिक वर्षातील थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने जानेवारीपासून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले असून, थकबाकीदार ग्राहकांनी त्यांच्याकडील चालू वीज बिल आणि थकबाकीचा त्वरित भरणा करून वीज पुरवठा खंडित केल्याने होणारी गैरसोय टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: 44 crore of electricity street lights in the district of Gram Panchayat in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम