वाशिम जिल्ह्यात तपासणीअंती ४६ क्षयरुग्ण सापडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 04:41 PM2018-12-07T16:41:43+5:302018-12-07T16:43:03+5:30
वाशिम : दुसºया टप्प्यातील प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम राबविल्यानंतर, आवश्यक त्या सर्व तपासणीअंती एकूण ४६ क्षयरुग्ण सापडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दुसºया टप्प्यातील प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम राबविल्यानंतर, आवश्यक त्या सर्व तपासणीअंती एकूण ४६ क्षयरुग्ण सापडले आहेत. १ लाख ६९ हजार ८८२ कुटुंबांना गृहभेटी दिल्या असून, १५६९ संशयित रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासण्यात आले.
क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टिकोनातून दुसºया टप्प्यातील प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर व चमूने गृहभेटी देत संशयित क्षयरुग्णांचा शोध घेण्यात प्रयत्न केला. या मोहिमेदरम्यान १ लाख ६९ हजार ८८२ कुटुंबांना गृहभेटी देण्यात आल्या. यापैकी १५६९ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात आला होता. या संशयित रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणी आणि क्ष किरण आदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर, वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्यानुसार ५४ जणांची ‘सीबी-नॅट’ तपासणी करण्यात आली. यापैकी ४६ जणांना क्षयरोग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाºयांनी क्षयरोगाबद्दल जनजागृती केली. ४६ क्षयरुग्णांना आता उपचारावर ठेवण्यात आले आहे. नियमित उपचाराअंती क्षयरुग्ण ‘नॉर्मल’ होतील, असा विश्वास डॉ. जिरोणकर यांनी व्यक्त केला.