४६६ शेतकऱ्यांना बसला अतिवृष्टीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 04:36 PM2020-07-04T16:36:19+5:302020-07-04T16:36:33+5:30
या नुकसानाचे पंचनामे करून मंडळ अधिकाºयांनी ४ जुलै रोजी अंतीम अहवाल तयार केला आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
धनज बु.(वाशिम) : परिसरात सोमवार २२ जूनच्या रात्री वादळीवाºयासह पाऊस पडला. यात १५ गावांतील ४६६ शेतकºयांच्या मिळून १९३.३७ हेक्टर क्षेत्रातील शेतजमिनीसह पिकांचे नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनामे करून मंडळ अधिकाºयांनी ४ जुलै रोजी अंतीम अहवाल तयार केला आहे.
कारंजा तालुक्यात धनज बु. महसूल मंडळात २२ जून रोजी तब्बल पाच तास धोधो कोसळलेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांनी केलेल्या पेरणीसह शेतजमिनी खरडून गेल्या, तर अनेकांच्या शेतात तलावाप्रमाणे पाणी साचले. या घटनेला आठवडा उलटल्यानंतरही नुकसानाच्या पंचनाम्यांची पडताळणी करून अहवाल तयार करण्यात आला नव्हता. लोकमतने या संदर्भात ३ जुलै रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच पंचनाम्यांची पडताळणी वेगाने सुरू करण्यात आली. शनिवार ४ जुलै रोजी धनज बु. महसूल मंडळ अधिकाºयांनी या नुकसानाच्या पंचनाम्याचा अंतीम अहवाल तयार केला. त्यानुसार धनज बु. येथे ३४.८६ हेक्टर, भिवरी ६.४०, धनज खु. २३.३२, हिंगणवाडी ७.५०, रामटेक ६.५५, अंबोडा, २४.४०, शिरसोली १०.४०, तामसवाडी ६.४०, भांबदेवी ९.९०, मेहा १३.१३, पेंघा (उजाड) १६.११, बोंद्रेवाडी २१.४०, माळेगाव ८.३० हेक्टर, धोत्रा जहॉगिर २.२० हेक्टर आणि मोरपूर २.५० हेक्टर अशी १५ गावे मिळून एकूण १९३.३७ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, तूर, कापूस आणि इतर पिकांचे नुकसान झाले, शिवाय शेतजमीन बाधित झाली आहे. आता हा अहवाल तहसील कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर पाठविण्यात येणार आहे.