दिवसभरात ४७ पॉझिटिव्ह; ९२ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 07:16 PM2020-11-28T19:16:00+5:302020-11-28T19:16:22+5:30
CoronaVirus in Akola ३५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९३३३ वर गेली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार २८ नोव्हेंबर रोजी आणखी ४७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९३४५ वर गेली आहे. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे ३५, तर रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांच्या १२ अहवालांचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३४४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये विठ्ठल नगर, गोरक्षण रोड व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, शिवाजी नगर, सिंधी कॅम्प, राम नगर, शास्त्री नगर, निंबा ता. मूर्तिजापूर, अकोट, चोहट्टा बाजार, प्रोफेशन कॉलनी, आपातापा रोड, गुडधी, कैलास टेकडी, काळेगाव व जीएमसी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी भागवत पेठ, केशव नगर, रघुवीर नगर, घोडेगाव ता. तेल्हारा, रणपिसे नगर, राधे नगर, बोरगाव मंजू, छोटी उमरी व खिरपुरी ता. बाळापूर येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
रॅपिड चाचण्यांमध्ये १२ पॉझिटिव्ह
शनिवारी झालेल्या एकूण १२९ रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत २५०२८ चाचण्यांमध्ये १७६८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
९२ जण कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, अवघते हॉस्पिटल येथून एक तसेच होम असोलेशनमधील ८२ अशा एकूण ९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६१२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९३४५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८४४९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६१२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.