वाशिम जिल्ह्यातील ४८४ शाळेला ‘डिजिटल’ची जोड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:32 PM2018-08-21T12:32:29+5:302018-08-21T12:35:11+5:30

वाशिम - लोकवर्गणी आणि समग्र शिक्षा अभियानाच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या ४८४ शाळांना ‘डिजिटल’ची जोड मिळाली असून, उर्वरीत २८९ शाळा डिजिटल करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने सोडला आहे.

484 schools in Washim district get digital link! | वाशिम जिल्ह्यातील ४८४ शाळेला ‘डिजिटल’ची जोड !

वाशिम जिल्ह्यातील ४८४ शाळेला ‘डिजिटल’ची जोड !

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. आनंददायी शिक्षण कसे घेता येईल, यासाठी डिजीटल शाळा करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पुरेशा निधीअभावी प्रत्येक शाळेच्या वर्गखोल्या डिजिटल करणे शक्य नसल्याने लोकवर्गणीवर भर देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - लोकवर्गणी आणि समग्र शिक्षा अभियानाच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या ४८४ शाळांना ‘डिजिटल’ची जोड मिळाली असून, उर्वरीत २८९ शाळा डिजिटल करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने सोडला आहे.
शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात अध्ययन, अनुभव प्रदान करता यावे म्हणून जि.प. शाळांना डिजिटलची जोड दिली जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्ययन करणाºया विद्यार्थ्यांना दप्तरमुक्त शिक्षणासाठी बहुतांश शाळांनी पुढाकार घेतला. या माध्यमातून हसत-खेळत शिक्षणप्रणालीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गळती आणि शिक्षणाप्रती आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आनंददायी शिक्षण कसे घेता येईल, यासाठी डिजीटल शाळा करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पुरेशा निधीअभावी प्रत्येक शाळेच्या वर्गखोल्या डिजिटल करणे शक्य नसल्याने लोकवर्गणीवर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ७७३ प्राथमिक शाळा आहेत. शिक्षक, पालक व गावकºयांची लोकवर्गणी आणि समग्र शिक्षा अभियानांतर्गतच्या निधीतून ४८४ शाळेत डिजिटल वर्गखोली उभारण्यात आली आहे. केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सहकार्यातून तसेच पालक व गावकºयांच्या लोकवर्गणीतून अधिकाधिक शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

Web Title: 484 schools in Washim district get digital link!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.