सायकलींचा ४९ लाखांचा निधी पंचायत समित्यांना वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:58 PM2019-07-03T14:58:17+5:302019-07-03T14:58:22+5:30

४९.९१ लाखांचा निधी मंजूर असून तो जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

49 lakhs are funded to Panchayat Samitee for Bicycles | सायकलींचा ४९ लाखांचा निधी पंचायत समित्यांना वर्ग

सायकलींचा ४९ लाखांचा निधी पंचायत समित्यांना वर्ग

Next

- सुनील काकडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मानव विकास मिशन अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील पात्र १४२६ विद्यार्थीनींना सायकल खरेदी करून देण्यासाठी प्रती विद्यार्थीनी साडेतीन हजार याप्रमाणे ४९.९१ लाखांचा निधी मंजूर असून तो जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून सलग पाठपुरावा केला होता, हे विशेष.
मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत; मात्र काही उपक्रम, योजनांना प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसत आहे. मानव विकास मिशनअंतर्गतची मोफत सायकल योजनाही प्रशासकीय दिरंगाईत अडकली होती. मानव विकास मिशनमध्ये समाविष्ट चार तालुक्यांमध्ये इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाºया तथा शाळेपासून पाच किलोमिटरपेक्षा अधिक अंतरावर वास्तव्यास असणाºया विद्याथीर्नीनींना सायकल खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या खात्यात १४२६ सायकलींसाठी ४९ लाख ९१ हजारांचा निधी लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी वळता करण्यात आला होता; परंतु २०१८-१९ चे शैक्षणिक सत्र संपूनही त्याचे पंचायत समिती स्तरावर वाटप झाले नव्हते.
यासंबंधी ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून हा विषय उजागर केला. अखेर त्याची दखल घेत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून २०१९-२० चे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर सायकलींसाठी प्राप्त झालेला निधी पंचायत समितीनिहाय वाटप करण्यात आला. पंचायत समित्यांनी पुढची कार्यवाही म्हणून संबंधित शाळांना पात्र विद्यार्थीनींची यादी मागितली असून त्यानुसार रकमेचे वितरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या १४२६ विद्यार्थीनींना सायकल खरेदी करण्यासाठी साडेतीन हजार रुपये याप्रमाणे ४९.९१ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. तो पंचायत समित्यांकडे वर्ग करण्यात आलेला आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत संबंधित शाळांमधील पात्र विद्यार्थीनींना तो मुख्याध्यापकांमार्फत दिला जाणार असून संबंधित शाळांमध्ये पालकांनी संपर्क साधावा.
- टी.एन. नरळे
माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम

मालेगाव तालुक्यातील १५ शाळांमधील ३६० विद्यार्थीनींना सायकल खरेदी करण्यासाठी मिळालेला निधी मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा करण्यात आला असून पात्र मुलींच्या खात्यात तो वळता करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- राजेंद्र शिंदे
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, मालेगाव

 

Web Title: 49 lakhs are funded to Panchayat Samitee for Bicycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.