५ आॅक्टोबरला होणार लाभार्थी निवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:36 PM2017-10-01T13:36:44+5:302017-10-01T13:37:10+5:30

5 October will be the beneficiary selection! | ५ आॅक्टोबरला होणार लाभार्थी निवड!

५ आॅक्टोबरला होणार लाभार्थी निवड!

Next
ठळक मुद्देगोदाम बांधकाम अनुदान लॉटरी पद्धती राबविली जाणार

वाशिम : कृषी विभागातर्फे गोदाम बांधकामासाठी १२.५० लाख रुपये अनुदान मिळणार असून, या योजनेसाठी लाभार्थींची पारदर्शक निवड करण्यासाठी ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया केली जाणार आहे. 

शेतकºयांना कृषीविषयक साहित्य व अन्य अनुदानाचा लाभ देण्यासाठी कृषी विभागातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. यापैकीच एक असलेली राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान योजना सन २०१७-१८ या वर्षात राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत फ्लेक्झी फंड बाबीमधून शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक शेतकरी गोदाम बांधकामाचा लाभ घेऊ शकतात. गोदाम बांधकामासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १२.५० लाख अनुदान देण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यात ३ गोदाम बांधकामाचा लक्ष्यांक असून, अधिक अर्ज प्राप्त झाल्याने आता लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड केली जाणार आहे. ५ आॅक्टोबर रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर केलेल्या शेतकºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले.

Web Title: 5 October will be the beneficiary selection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.