शाळेच्या ५0 वर्गखोल्यांची दुरवस्था

By admin | Published: December 5, 2015 09:09 AM2015-12-05T09:09:22+5:302015-12-05T09:09:22+5:30

वाशिम जिल्हा परिषदेच्या एकूण ७७९ शाळा; नवीन बांधकामासाठी निधीला मान्यता

50 School Villages Due | शाळेच्या ५0 वर्गखोल्यांची दुरवस्था

शाळेच्या ५0 वर्गखोल्यांची दुरवस्था

Next

संतोष वानखडे / वाशिम : नादुरूस्त व अपुर्‍या वर्गखोल्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत गतिरोधक निर्माण केला आहे. गत दोन वर्षांपासून बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या ८३ शाळेच्या १00 वर्गखोल्यांना आता चकाकी मिळण्याची चिन्हे असून, शासनाने सव्वा पाच कोटींचा निधी मंजूर केला. नवीन वर्षात ५0 नादुरूस्त खोल्यांची दुरूस्ती आणि ५0 नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण ७७९ शाळा असून, येथे शिक्षण दिले जाते. अनेक शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात वर्गखोल्या नाहीत, तसेच काही शाळांच्या वर्गखोली वादळवारा व अवकाळी पावसाने जमीनदोस्त केल्या. याची संख्या ५0 च्या घरात आहे. परिणामी, दोन-तीन वर्गातील विद्यार्थ्यांना एका वर्गखोलीत बसविण्याची वेळ शिक्षकांवर आली. हिवाळा व उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात बसवून शिकवावे लागते. गत दोन वर्षांपासून ८३ ठिकाणी अशीच ह्यशाळाह्ण भरत आली आहे. जुन्या वर्गखोल्यांची दुरूस्ती आणि नव्याने वर्गखोली मंजूर करण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकवेळा चर्चेत आला. शिक्षण समितीने शासनदरबारी हा प्रश्न मांडला. नोव्हेंबरच्या पंधरवड्यात शासनाने ८३ शाळेच्या १00 वर्गखोली बांधकामाला मंजुरात दिली. जवळपास सव्वा पाच कोटींचा निधी मंजूर झाल्याने वर्गखोली बांधकाम, स्वच्छतागृहे, रखडलेली खोली बांधकाम, नवीन वर्गखोली आदींची कामे प्रस्तावित आहेत. वाशिम तालुक्यातील १५, रिसोड १७, मानोरा १0, मंगरुळपीर १३, मालेगाव व कारंजा प्रत्येकी १४ अशा एकूण ८३ शाळेच्या १00 वर्गखोल्यांचा यामध्ये समावेश आहे. या बांधकामावर शाळा व्यवस्थापन समिती व गटशिक्षणाधिकार्‍यांना लक्ष ठेवावे लागणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीला खर्चाचे स्वतंत्र लेखे ठेवावे लागणार आहे. बांधकामाचा करार केलेल्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत वर्गखोलीचे बांधकाम पूर्ण करण्याचे बंधन संबंधितांवर टाकण्यात आले. २0१५-१६ चे शैक्षणिक सत्र सं पेपर्यंत विद्यार्थ्यांना अपुर्‍या वर्गखोलीतच शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत.

Web Title: 50 School Villages Due

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.