दानपेटीतून ५0 हजारांचा ऐवज लंपास
By admin | Published: December 7, 2015 02:26 AM2015-12-07T02:26:32+5:302015-12-07T02:26:32+5:30
चोरट्याने वाशिम येथील दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी फोडली.
वाशिम: शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये असलेल्या दुर्गादेवी मंदिरामधून अज्ञात चोरट्याने दानपेटीमधील २५ हजार रुपये व देवीच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केले. ही घटना ५ ते ६ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान घडली.
शहरातील शिव चौक परिसरातील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील एक ते दोन हजार रुपये लंपास करण्याच्या घटनेला चार दिवस उलटलेले नसताना दुसर्या एका मंदिरामध्ये चोरट्यांनी चोरी केली. महाराणा प्रताप चौकामध्ये दुर्गादेवी मंदिरामधील काचेची दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडली. त्यामधील २५ हजार रुपये व देवीच्या गळ्यामध्ये असलेले सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले. आठवडाभरात दोन मंदिरांमध्ये लागोपाठ चोर्या झाल्यामुळे या दोन्ही चोर्या एकाच चोरट्याने केल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. उपरोक्त घटनेची फिर्याद अरुणसिंह ठाकूर यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.