वाशिममध्ये कुस्त्यांच्या दंगलीची ५० वर्षांची परंपरा यंदाही कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 03:43 PM2018-10-31T15:43:33+5:302018-10-31T15:43:59+5:30
वाशिम : राज्यभरातील मल्लांकडून प्रतीक्षा केल्या जाणाºया वाशिममधील कुस्त्यांच्या दंगलीची ५० वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यभरातील मल्लांकडून प्रतीक्षा केल्या जाणाºया वाशिममधील कुस्त्यांच्या दंगलीची ५० वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली असून येत्या चार नोव्हेंबरपासून त्यास सुरूवात होत आहे. श्री बालासाहेब यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित या स्पर्धेत यशस्वी होणाºया मल्लांना लाखो रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी बुधवारी दिली.
श्री बालासाहेब यात्रेनिमीत्त तथा स्व. गोविंदराव भालेराव यांच्या प्रेरणेतून ५० वर्षांपासून वाशिममध्ये कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते. दरम्यान, स्पर्धेचे यंदाचे वर्ष ५१ वे असून दरवर्षीप्रमाणे यंदाही भरघोस बक्षीसांची तरतूद करण्यात आली आहे. ४ नाव्हेंबरला होणाºया स्पर्धेतील विजेत्या मल्लांना प्रथम बक्षीस ७ हजार, व्दितीय ६ हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ ३ हजार, पाचवे २ हजार आणि सहावे १ हजाराचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच ५ नोव्हेंबरला होणाºया स्पर्धेतील विजेत्या मल्लांना प्रथम बक्षीस ५१ हजार, द्वितीय ३१ हजार, तृतीय २१ हजार, चतुर्थ ११ हजार, पाचवे ७ हजार अशी बक्षीसे दिली जाणार आहेत.
समाजातील युवापिढीला बलवान, शिलवान, चारित्र्यवान बनविण्याच्या हेतूने विनामुल्य कुस्त्यांची आम दंगल आयोजित केली आहे. गेल्या ५१ वर्षांपासून होणाºया या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, विदर्भ केसरी असे अनेक मल्ल खेळून गेले आहेत.
बबन भालेराव
अध्यक्ष, महाराष्ट्र कुस्तीगीर मंडळ, वाशिम