वाशिम शहरात पाच हजार वृक्षांचे रोपन व संगोपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:35 PM2019-06-01T13:35:49+5:302019-06-01T13:36:13+5:30

वाशिम :  शहर हिरवेगार करण्यासाठी वाशिम नगरपरिषद व मी वाशिमकर गृपच्यावतिने पाच हजार वृक्षांचे रोपन व संगोपन करण्याचा निर्णय येथील नगरपरिषदमध्ये झालेल्या सभेत घेण्यात आला. 

5000 trees planting and raising in Washim city | वाशिम शहरात पाच हजार वृक्षांचे रोपन व संगोपन

वाशिम शहरात पाच हजार वृक्षांचे रोपन व संगोपन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम :  शहर हिरवेगार करण्यासाठी वाशिम नगरपरिषद व मी वाशिमकर गृपच्यावतिने पाच हजार वृक्षांचे रोपन व संगोपन करण्याचा निर्णय येथील नगरपरिषदमध्ये झालेल्या सभेत घेण्यात आला. 
नगरपरिषद अध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात ३० मे रोजी झालेल्या सभेस नगराध्यक्ष अशोक हेडा, मुख्याधिकारी वसंत इंगोले, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अग्रवाल यांच्यासह मी वाशिमकर गृपचे सदस्य मोठया प्रमाणात उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी वाशिम शहर हिरवेगार करण्यासाठी मी वाशिमकर गृप राबवित असलेला उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमास आपले सहकार्य राहणार असून नगरपरिषद या गृपच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तसेच नगरपरिषदेने सुध्दा या उपक्रमासाठी सहकार्य करुन शहर हिरवेगार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे हेडा म्हणाले. वाशिम शहर हिरवेगार व्हावे हे आपलेही स्वप्न आहे. त्याकरिता सर्वोतपरी मदतीसाठी आपण तयार असून या महान कार्यात शहरवासियांनीही उतरुन उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी केले. मुख्याधिकारी वसंत इंगोल यांनी सुध्दा आपण वाशिमकर गृपने सुरु केलेल्या या उपक्रमात सुरुवातीपासूनच सहभागी आहोत. शहर विकासासाठी अश्या उपक्रमाची गरज आहे. तसेच या गृपच्यावतिने काळविट व विटाळी तलावाच्या खोलीकरण कामाबाबत आपल्याशी चर्चा केल्याने नगरपरिषदेच्यावतिने त्यांना पूर्ण सहकार्य केल्या जात आहे. जलसंधारण व वृक्षारोपण काळाची गरज असून या चांगल्या कार्यात नगरपरिषद प्रशासन पूर्णपणे पाठिशी उभे राहणार असल्याचे वसंत इंगोले यांनी सांगितले. यावेळी वाशिमकर गृप व नगरपरिषद प्रशासान यांच्या सामजंस्य करार करण्यात आला असून लवकरच संपूर्ण शहरातील कॉलनी, ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवून या अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. यााकरिता नागरिकांनी सुध्दा सहभाग वाढविण्याचे आवाहन वसंत इंगोले यांनी यावेही केले. यावेळी वाशिमकर गृपच्या काही सदस्यांनी सुध्दा आपले विचार व्यक्त केलेत. शहरात लावण्यात येणाºया वृक्षांच्या संरक्षणासाठी वाशिमकर गृपच्यावतिने वृक्षांना टीगार्ड सुध्दा लावण्यात येणार आहेत.  सभेला वाशिमकर गृपचे सर्व सदस्यांसह नगरपरिषदेचे पदाधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.

Web Title: 5000 trees planting and raising in Washim city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.