५२ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पूर्ण
By admin | Published: July 2, 2017 07:37 PM2017-07-02T19:37:10+5:302017-07-02T19:37:10+5:30
वाशिम : वाशिम तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक २०१७ चा कार्यक्रम जाहिर झाला असून, २१ ते २४ जून या दरम्यान वार्ड निश्चितीकरण व आरक्षण सोडत काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक २०१७ चा कार्यक्रम जाहिर झाला असून, २१ ते २४ जून या दरम्यान वार्ड निश्चितीकरण व आरक्षण सोडत काढण्यात आली. ४ जूलैपासून हरकती व आक्षेप मागविले आहेत.
पाच वर्षाचा कालावधी संपत आल्याने तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. प्रतिष्ठा जपण्यासाठी गावातील दिग्गज मंडळी ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्व कसब पणाला लावते. निवडणुकीपूर्वी या ग्रामपंचायतींची वार्ड निश्चित करण्यासाठी तसेच आरक्षण सोडत काढण्यासाठी वाशिम तहसील कार्यालयाने २१ जून ते २४ जून या दरम्यान संबंधित गावांत ग्रामसभा आयोजित केल्या होत्या.
२१ जून रोजी अंजनखेड, चिखली खु., सापळी, सोनखास, खंडाळा खु., धानोरा बु., भटउमरा, पांडव उमरा, घोटा, राजगाव, हिस्से बोराळा, शिरपूटी, जवळा येथील ग्रामपंचायतींची वार्ड निश्चितीकरण व आरक्षण सोडत काढण्यात आली. २२ जून रोजी सावळी, मोहजा रोड, सावरगाव बर्डे, कोंडाळा म., खरोळा, धानोरा खु., शेलगाव, बोरी बु., आसोला, गणेशपूर, वाघोली बु., वाई, चिखली बु. तर २३ जून रोजी कार्ली, सुराळा, गोंडेगाव, शेलु बु., जयपूर, नागठाणा, जुमडा, जांभरूण महाली, फाळेगाव थेट, देपूळ, सोंडा, सुकळी, धुमका तसेच २४ जून रोजी कृष्णा, ढिल्ली, जांभरूण प., हिवरा रोहिला, तांदळी शेवई, साखरा, सुपखेला, उमरा श., बाभूळगाव, उमरा कापसे, ब्राह्मणवाडा, कोकलगाव व टणका येथील वार्ड निश्चितीकरण व आरक्षण सोडत काढण्यात आली. ४ ते ११ जुलै दरम्यान आक्षेप, हरकती मागविल्या आहेत. त्यानंतर वार्ड निश्चिती व आरक्षण सोडत निश्चित केली जाणार आहे.