वाशिम जिल्ह्यातील ५३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 11:19 AM2021-04-07T11:19:12+5:302021-04-07T11:20:10+5:30

53 villages in Washim district corona free : जिल्ह्यातीलच ५३ गावांमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

53 villages in Washim district block Corona at the gate! | वाशिम जिल्ह्यातील ५३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले!

वाशिम जिल्ह्यातील ५३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्गाच्या भीतीने जो-तो घाबरलेल्या अवस`थेत आहे. प्रशासनही संसर्गाच्या संकटापुढे हतबल झाले आहे. असे असताना जिल्ह्यातीलच ५३ गावांमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्याची किमया साध्य केली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे बाधीत पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. तेव्हापासून दिवसागणिक ही संख्या वाढत गेली. सोबतच कोरोनाने मृत्यू होण्याच्या प्रमाणातही गेल्या काही दिवसांत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील ५३ गावांमध्ये अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. 
यात वाशिम तालुक्यातील कुंभारखेडा, मालेगाव तालुक्यातील कोल्ही, हनवतखेडा, जोगलदरी, वाकापूर, गांगलवाडी, भामटवाडी, पिंपळवाडी, सोनखास, साखरापूर, रिसोड तालुक्यातील मुंगसाजी नगर, जायखेडा, तपोवन, मंगरूळपीर तालुक्यातील रुई, एकांबा, मानोरा तालुक्यातील वडगाव, बळीराम नगर, उंबर्डा, जामदरा, जवळा, देवठाणा, एकलारा, इंगलवाडी, मेंदरा, वटफळ, कारंजा तालुक्यातील अलीमर्दापूर, तारखेडा, तांदळी, मुकूटपूर, जयपूर, अजमपूर, गंगापूर, वहीतखेड, पलाना, जानोरा, पानगव्हाण, वाकी, मांडवा, तपोवन, खेडा खु., जामठी, जलालपूर, शहादतपूर, मजलापूर, ढंगारखेडा, डोंगरगाव या गावांचा समावेश आहे.


गावातील लोकांनी बाहेरगावी ये-जा करणे बंद केले. आवश्यकता नसताना बाजारात किंवा गर्दीच्या ठिकाणी कोणी जात नाही. गावातील प्रत्येकजण मास्कचा वापर करतो. स्वत:च्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतो. त्यामुळेच गावात आजपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ही आमच्यासाठी भूषणावह बाब आहे.
- संजय राठोड, 
सरपंच, ग्रा.पं. देवठाणा

गावकऱ्यांनी सुरूवातीपासूनच कोरोनाची मनात भीती बाळगली नाही; मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी तंतोतंत पालन केले. पाैष्टीक आहार घेणे, बाहेरगावी प्रवास करायचा झाल्यास तोंडाला मास्क लावणे, फिजीकल डिस्टन्सिंग ठेवण्याचा नियम पाळला जातो. त्यामुळेच कोरोनाला रोखणे शक्य झाले आहे.
- उत्तम अंबोरे
सरपंच, कोलार, ता. मानोरा


गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी वेळोवेळी ध्वनिक्षेपकाव्दारे जनजागृती केली. गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क लावणे आदी नियमांचे काटेकोर पालन करण्यास गावकऱ्यांना प्रोत्साहित केले. गावातील महिलांनाही कोरोना चाचणी बंधनकारक केली. त्यामुळेच अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण गावात आढळला नाही.
- सुनील राऊत
सरपंच, हनवतखेडा (ता.मालेगाव) 

Web Title: 53 villages in Washim district block Corona at the gate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.