५४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त!

By admin | Published: March 15, 2017 02:53 AM2017-03-15T02:53:38+5:302017-03-15T02:53:38+5:30

वाशिम नगर परिषदेची कारवाई ; थकबाकीदारांचे धाबे दणाणले.

54 lakh worth of property seized! | ५४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त!

५४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त!

Next

वाशिम, दि. १४- ज्या नागरिकांकडे थकीत कर होते, अशा १0 जणांची ५४ लाख रुपयांची मालमत्ता १४ मार्च रोजी वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आली.
मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण कर वसुली करण्याच्या आदेशानुसार वाशिम नगर परिषदेच्यावतिने मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्वप्रथम थकीतदारांना नोटिस त्यानंतर त्यांच्या नावाचे फलक चौकामध्ये लावूनही ज्यांनी करभरणा केला नाही, अशा थकीतदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई १४ मार्चपासून सुरु करण्यात आली.
आज पहिल्या दिवशी थकीतदारांपैकी १0 जणांची एकूण मालमत्ता ५४ लाख ९ हजार ६५३ रुपये जप्त करण्यात आली. यामध्ये दि वाशिम जिनिंग अँन्ड को-ऑप. प्रेसिंग ३३१३७0५ रुपये, कार्यकारी अभियंता लघू पाटबंधारे विभाग ७२४९८१, मे. हरी सन्स इंडस्ट्रिज ४९६४५0, रामकिशोर सेवाराम राठी १९0५८६, कृउबास समिती, लक्ष्मणसिंह हिरासिंह ठाकूर ११७0४६, कृउबास समिती, मदनसिंह गोविंदसिह ठाकूर ११६२३२, उज्ज्वला समाधान मोरे १0३५५५, कृउबास समिती, अवधुत दत्तात्रय देशमाने ८८३३९ व कृउबास समिती, राधेश्याम सुरजसिंह ठाकूर ८६१७४ रुपयांचा समावेश आहे.
सदर मालमत्ता जप्तीची कार्यवाही मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या आदेशानुसार कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार, सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करसंग्राहक साहेबराव उगले, संतोष किरळकर, शिवाजी इंगळे, दत्तात्रय देशपांडे, केशव खोटे, नाजीमोद्दीन मुल्लाजी, रमजान बेनीवाले, संजय काष्टे, मनोज इंगळे, कुणाल कनोजे, मुन्ना खान यांनी केली.

Web Title: 54 lakh worth of property seized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.