मेडशी येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:45 PM2018-05-30T18:45:25+5:302018-05-30T18:45:25+5:30
मेडशी : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून येथील परशराम बाळाजी घोड़े (५५) या शेतकºयाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २९ मे रोजी सायंकाळी घडली.
मेडशी : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून येथील परशराम बाळाजी घोड़े (५५) या शेतकºयाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २९ मे रोजी सायंकाळी घडली.
परशराम घोडे यांनी २९ मे रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले होते. पुढील उपचारार्थ त्यांना अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावावर १.६२ हेक्टर जमीन असून, त्यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे ७६ हजार १६० रुपयांचे कर्ज होते. त्यांनी ५ मे २०१८ रोजी व्याजासह संपूर्ण कर्जाचा भरणा केला. त्यांनी सन २०१८ चा पीककर्जाचा वाटप ८७ हजार रुपये चालू महिन्यात घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आहेत. ३० मे रोजी मेडशीच्या तलाठ्यांनी यासंदर्भात तहसिलदारांना प्राथमिक अहवाल सादर केला.