अवकाळी पाऊस, गारपिटीने ५,५९३ हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 10:59 AM2021-03-25T10:59:31+5:302021-03-25T10:59:37+5:30

Washim News गारपिटीने ५५९३ हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, मूग, ज्वारी, कांदा, पपई आदी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले.

5,593 hectares affected by unseasonal rains and hail | अवकाळी पाऊस, गारपिटीने ५,५९३ हेक्टर क्षेत्र बाधित

अवकाळी पाऊस, गारपिटीने ५,५९३ हेक्टर क्षेत्र बाधित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात १९ ते २१ मार्च या कालावधीत वादळी वारा, अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने ५५९३ हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, मूग, ज्वारी, कांदा, पपई आदी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले. यामुळे २२ महसूली मंडळांतर्गत येणाऱ्या १४२ गावांमधील ७६०१ शेतकरी बाधित झाले असून तसा अहवाल प्रशासनाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, २२ आणि २३ मार्च राेजी देखील  काही ठिकाणी  अवकाळी पाऊस व गारपीट झाली असून यामुळे नुकसानाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता  आहे.
तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे, जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त (पुनर्वसन विभाग) यांच्याकडे २० मार्च रोजी ६६९७ शेतकऱ्यांच्या ४८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर केला होता. त्यानंतरही अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे  नुकसानग्रस्त गावे व शेतकऱ्यांचा आकडा वाढला आहे. त्यानुषंगाने १९ ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या नुकसानाचा सुधारित अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार, वाशिम तालुक्यातील ६ महसूली मंडळातील ३९ गावांमध्ये १६९३ हेक्टरवरील कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे २१२३ शेतकरी बाधित झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील ६ महसूली मंडळातील ४० गावांमध्ये ११७० हेक्टरवरील उन्हाळी सोयाबीन, मूग, गहू, पपई, आंबा, उडीद, तीळ, कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे १८६१ शेतकरी बाधित झाले आहेत. रिसोड तालुक्यातील ३ महसूली मंडळातील २० गावांमध्ये १६८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून २१८७ शेतकरी बाधित झाले आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील ३ महसूली मंडळातील २२ गावांमध्ये ५०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ५५८ शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच मानोरा व कारंजा तालुक्यातील ४ महसुली मंडळातील २१ गावांमध्ये ५३६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यात ८७२ शेतकरी बाधित झाले आहेत, असा प्राथमिक नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
 

Web Title: 5,593 hectares affected by unseasonal rains and hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.