जिल्ह्यात ५६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:28 AM2021-07-16T04:28:27+5:302021-07-16T04:28:27+5:30
वाशिम : ‘लोकमत रक्ताच नातं’ मोहिमेंतर्गत २ जुलैपासून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. वाशिम ...
वाशिम : ‘लोकमत रक्ताच नातं’ मोहिमेंतर्गत २ जुलैपासून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. वाशिम जिल्ह्यात गुरुवारी तिरुपती सिटी येथे १७, जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात १४, जिल्हा सामान्य रुग्णालयात ०४, तर मालेगाव येथील शिबिरात २१ जण मिळून ५६ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली.
वाशिम येथील जिल्हा काॅग्रेस कार्यालयात युवक काँग्रेसच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार अमित झनक यांच्या हस्ते तर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबूराव शिंदे याच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बाबूराव शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकारातून १४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी आमदार अमित झनक यांनी ‘लाेकमत’ने सुरू केलेल्या रक्तदान माेहिमेचे काैतुक केले. या उपक्रमास काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुंबईला असताना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शुभेच्छा दिल्यात तसेच वाशिम येथीलच तिरुपती सीटीमध्ये आयाेजित रक्तदान शिबिरासाठी गिरीश लाहाेटी, बंकटलाल मानधने, एस.एस. लखानी, मनाेज कढणे, मकरंद दिघे, माताेश्री कांतादेवी डाळे रक्तपेढीचे अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. मधुकर राठाेड यांच्या मार्गदर्शनात रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी एस. बी. माेरे, जनसंपर्क अधिकारी एस. के. दंडे आदी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेण्यात आले.
..................
मालेगाव येथील रक्तदान शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद
वाशिम : येथील पंचायत समिती सभागृहात लोकमततर्फे आयोजित रक्तदान शिबिरात २१ जणांनी रक्तदान केले.
यावेळी मालेगांवचे तहसीलदार रवी काळे, गटविकास अधिकारी श्रीनिवास पद्मावार, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे रामेश्वर अवचार , आ. अमित झनक, जि. प.सदस्य शाम बढे , माजी जि. प. अध्यक्ष दिलीप जाधव , आशिष तिवारी, प्रदीप सावले, गणेश उंडाळ , भागवत मापारी, अभी घुगे , ज्ञानेश्वर आघाव, अभी देवकते यांनी भेट दिल्या. यावेळी पंचायत समिती कर्मचारी, शिवराज व्यायामशाळा, विघ्नहर्ता गणेश मंडळ, भूमिपुत्र शेतकरी संघटना, शिवाशक्ती गणश मंडळ , जैन संघटना, विदर्भ पटवारी संघ आदींनी सहकार्य केले.
...........
कवठा (चिखली)येथे लाेकमत रक्ताचं नातं माेहिमेतर्गंत शिबिर
वाशिम : रिसोड तालुक्यातील कवठा (चिखली) येथे शुक्रवार, १६ जुलैला ‘लोकमत‘ व स्वप्निल सरनाईक मित्रमंडळाच्यावतीने सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कवठा जिल्हा परिषद गटातील अधिकाधिक युवक, नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन माजी जि.प. सदस्य स्वप्निल सरनाईक व मित्रमंडळाने केले. शिबिरात काेराेना नियमांचे पालन केले जाणार असून नागरिकांनी मास्कचा वापर करावा.