ग्राम पंचायतींचा ५६ टक्के निधी अखर्चित !

By admin | Published: March 23, 2017 02:24 AM2017-03-23T02:24:34+5:302017-03-23T02:24:34+5:30

वाशिम जिल्ह्यातील स्थिती; ४४ कोटींचा निधी वितरित, १९.३६ कोटींचा खर्च.

56 percent funding of Gram Panchayats is printed! | ग्राम पंचायतींचा ५६ टक्के निधी अखर्चित !

ग्राम पंचायतींचा ५६ टक्के निधी अखर्चित !

Next

संतोष वानखडे
वाशिम, दि. २२- जिल्हयातील ४९१ ग्राम पंचायतींना २0१५-१६ व २0१६-१७ या कालावधीत १४ व्या वित्त आयोगातून ४४ कोटी रुपयांचा निधी मिळालेला असतानाही, जानेवारी २0१७ पर्यंंत केवळ १९.३६ कोटींचा खर्च करण्यात आला. २४.६४ कोटी रुपये अखर्चित असून, ही टक्केवारी ५६ च्या घरात जाते.
१४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी सन २0१५-१६ या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षे ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. जिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींना एकूण ४४ कोटी सात हजार रुपयांचा निधी वितरित केल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने जमा-खर्चाचा आढावा घेतला असता तब्बल २४ कोटी ६४ लाख ३ हजार ३६१ रुपये अखर्चित असल्याचे स्पष्ट झाले.एकिकडे अनेक गावांत मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत तर दुसरीकडे १४ व्या वित्त आयोगांतर्गतचा निधीही त्या-त्या गावात मोठय़ा प्रमाणात अखर्चित राहत असल्याने, ग्रामपंचायतींकडून गावकर्‍यांची दिशाभूल होण्याची भीती वर्तविली जात आहे.
स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी दरवर्षाला भरघोष निधी मिळणार असल्याने गावात मुलभूत सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या गावकर्‍यांच्या पदरी यामुळे निराशा पडली आहे. बहुतांश ग्रामपंचायतींचा लाखो रुपयांचा निधी अखर्चित राहत असतानाही, शासनाकडून निधीच मिळत नसल्याचे ह्यरडगाणेह्ण ग्रामपंचायतींच्या पदाधिकारी व सचिवांकडून गायिले जाते. पदाधिकारी व ग्रामसचिवांच्या ह्यरडगाण्याह्णचे पितळ अखर्चित निधीच्या आकडेवारीने उघडे पाडले आहे.

प्राप्त व अखर्चित निधीचा लेखाजोखा 

तालुकाप्राप्त निधी(लाख)           अखर्चित निधी (लाख)
वाशिम             ८१.३५                      १0.१४
मालेगाव           ७७.५७                      ६२.८८
रिसोड                ७८.२८                     ५८.४२
कारंजा              ६७.५२                      ४१.२८
मानोरा              ६७.९५                      ३३.३९
मंगरूळपीर        ६७.२९                      ४0.२७

Web Title: 56 percent funding of Gram Panchayats is printed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.