मंगरुळपीर तालुक्यात ५७६ मिमी पाऊस; पिकांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 02:05 PM2018-07-24T14:05:56+5:302018-07-24T14:06:46+5:30
मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस पडला असून आतापर्यंत ५७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मंगरुळपीर : तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस पडला असून आतापर्यंत ५७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गतवर्षी पडलेल्या पावसाची सरासरी जुलै महिना संपायच्या आधीच पूर्ण झाली असून अजून पाऊस सुरूच राहील्यास पिकांना मात्र धोका निर्माण होणार आहे.
गतवर्षी तालुक्यात कमी पाऊस पडल्याने पिकांनाही याचा फटका बसला होता तसेच शहरासह तालुक्यात उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती.जलाशयात पाणीच नसल्याने प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा केला होता.परंतु यावर्षी जून महिन्यातच पावसाने तालुक्यात हजेरी लावली होती.त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला.परंतु त्यानंतरही कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरूच असून जुलै महिन्यात सतत १५ दिवस पाऊस कमीअधिक प्रमाणात सुरूच होता.आज रोजी ५७६ मिमी पावसाची नोंद झाली असून गतवर्षी गतवर्षी ५८१ मिमी पावसाची नोंद तालुक्यात झाली होती.परंतु सध्या जुलै महिनाच सुरु असून अजून कमीतकमी एक महीना पावसाळा शिल्लक आहे.त्यामुळे पाऊस अजूनही पडणार आहे.यामुळे मात्र शेतकºयांच्या खरीप हंगामातील पिके धोक्यात येणार आहेत. सध्यस्थीतीतच पिकांची पाने पिवळी पडत आहेत.त्यामुळे जास्त पावसाळा असल्याने शेतकरी वर्ग भीती व्यक्त करीत आहेत.