कोरोना लसीसाठी नोंदणी ५८३८ आरोग्य कर्मचाऱ्यांची; डोस उपलब्ध सहा हजार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:34 AM2021-01-14T04:34:01+5:302021-01-14T04:34:01+5:30
मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनातर्फे ठोस उपाययोजना केल्या ...
मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनातर्फे ठोस उपाययोजना केल्या असून, नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. कोरोनाची लस उपलब्ध झाली असून, १६ जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून सरकारी व खासगी क्षेत्रातील ५८३८ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात सहा हजार डोस उपलब्ध झाले असून, तूर्तास तरी लसीचा कोणताही तुटवडा भासणार नसल्याचे दिसून येते. एका महिन्यानंतर कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग सज्ज असून, १६ जानेवारीपासून लसीकरण केले जाईल.
००
मोबाईलवर मिळणार लसीकरणाचा संदेश
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील नागरिक व अतिजोखीम, जोखीम गटातील नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. लसीकरणासंदर्भात नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना मोबाइलवर संदेश येणार आहे.
००००
तयारी लसीकरणाची
किती लोकांना मिळणार लस ५८३८
नोंदणी केलेले आरोग्य सेवक
५८३८
पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला उपलब्ध होणारे डोस ६०००
जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण ६८१५
०००००००
फ्रंट लाईन वर्कर्स यांना पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून कोरोना लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५८३८ आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार असून, जिल्ह्यात सहा हजार डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे नोंदणी झालेल्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना काेरोना लस मिळणार आहे. लसीकरणासाठी आराेग्य विभाग सज्ज आहे.
- डाॅ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी