सावकारांकडून ५८८ जणांनी घेतले १.२७ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 12:45 PM2021-01-07T12:45:11+5:302021-01-07T12:47:50+5:30

Washim News ५८८ जणांनी परवानाधारक सावकारांकडून १ कोटी २७ लाख ७३ हजाराचे कर्ज घेतले आहे.

588 borrowed Rs 1.27 crore from moneylenders | सावकारांकडून ५८८ जणांनी घेतले १.२७ कोटींचे कर्ज

सावकारांकडून ५८८ जणांनी घेतले १.२७ कोटींचे कर्ज

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात ३९ परवानाधारक सावकार आहेत.रिसाेड व कारंजा तालुक्यात प्रत्येकी ११ आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बॅंकांच्या जाचक अटी आणि दिरंगाई यामुळे जिल्ह्यात ५८८ जणांनी सरत्या वर्षात परवानाधारक सावकारांकडून १.२७ कोटींचे कर्ज घेतले.
खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह राष्ट्रीयकृत बॅंकांकडून पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते. तथापि, जाचक अटी व कर्ज मिळण्यास दिरंगाई तसेच अन्य कारणांमुळे अनेकजण परवानाधारक तसेच अनधिकृत सावकाराकडून कर्ज घेतात. जिल्ह्यात ३९ परवानाधारक सावकार आहेत. सर्वाधिक परवानाधारक सावकार रिसाेड व कारंजा तालुक्यात प्रत्येकी ११ आहेत. शेतकऱ्यांसह अन्य नागरिकही सावकारांकडून कर्जाची उचल करतात. सन २०२० या वर्षात जिल्ह्यातील ५८८ जणांनी परवानाधारक सावकारांकडून १ कोटी २७ लाख ७३ हजाराचे कर्ज घेतले आहे.  याशिवाय परवाना नसलेल्या सावकाराकडूनदेखील कर्जाची उचल केली जाते. 
 
अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी 
अधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास वर्षाला नऊ टक्के, बिगरतारणसाठी १२ टक्के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ टक्के आणि बिगर कृषी बिगर तारणसाठी १८ टक्के व्याजदर आकारला जातो. 

Web Title: 588 borrowed Rs 1.27 crore from moneylenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.